Eknath Khadse : एकनाथ खडसे भडकले; म्हणाले गिरीश महाजनांना भर चौकात जोड्याने मारेन

राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) यांना हृदयविकाराचा( heart disease) झटका आला होता त्यावरून भाजप (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खडसेंनी हृदयविकाराचा त्रास झाल्याचे नाटक केले

Eknath Khadse

एकनाथ खडसे भडकले; म्हणाले गिरीश महाजनांना भर चौकात जोड्याने मारेन

मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) यांना हृदयविकाराचा( heart disease) झटका आला होता त्यावरून भाजप (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खडसेंनी हृदयविकाराचा त्रास झाल्याचे नाटक केले असल्याचे म्हणाले होते. त्यावरून खडसे यांनी महाजन यांचा चांगलाच समाचार घेतला. महाजन यांनी माझे कागदपत्र तपासून पहावी जर हे सिद्ध झालं तर मी गिरीश महाजन यांना भर चौकात जोडे मारायला तयार असल्याचे खडसे म्हणाले. 

खडसे म्हणाले की, गिरीश महाजन यांनी माझ्या आजारावर प्रतिक्रिया दिली. महाजन यांनी माझ्या आजारावर प्रतिक्रिया दिली. मला वाटतं त्यांचं वय साठ वर्षांचं होत आले आहे त्यामुळे साठी आणि बुद्धी नाठी असं होत आहे. त्यामुळे त्यांना काही सुचत नाही असं दिसतंय. वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना त्यांनी स्त्रीरोगांकडे जास्त लक्ष दिलं त्यामुळे त्यांचं हृदयरोगांकडे कमी लक्ष गेलं. त्यांना जर खात्री करायची असेल तर माझी कागदपत्रं तपासावीत त्यात कार्डिअॅटिक अरेस्ट काय असेल तो देखील पाहून घ्यावा.

संत मुक्ताबाईंचे आणि अनेकांचे आशीर्वाद माझ्या पाठिशी

माझं हृदय बंद पडलं होतं. बंद पडलेलं हृदय सुरु करण्यासाठी अथक परिश्रम डॉक्टरांना करावे लागले. 70 ते 80 लाख लोकांमधून एखादा अशा अवस्थेतून परत येतो, तसा मी परत आलो. कारण संत मुक्ताबाईंचे आणि अनेकांचे आशीर्वाद माझ्या पाठिशी होते. पण आता गिरीश महाजन यांना हे कसं कळणार? असा प्रश्न खडसे यांनी महाजन यांना केला आहे. 

तर मी गिरीश महाजन यांना भर चौकात जोडे मारायला तयार 

माझा आजार खरा आहे की खोटा आहे हे त्यांनी तपासून घ्यावे. जर त्यांना हे सांगता आलं की माझा आजार खोटा आहे, सहानुभूती मिळावी म्हणून मी हे केलं आहे तर गिरीश महाजन यांनी भर चौकात मला जोडे मारावेत. पण माझी कागदपत्रं खरी आहेत हे सिद्ध झालं तर मी गिरीश महाजन यांना भर चौकात जोडे मारायला तयार आहे. असे खडे बोल खडसे यांना महाजन यांना सुनावले आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest