उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नियोजित बारामती दौरा अखेर रद्द
पुणे : आरक्षणासाठी मराठा आंदोलक (Maratha protestors) आक्रमक झाले असून बारामती येथे होणारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. (maratha andolan)
बारामती येथे होणाऱ्या कार्यक्रमाला केवळ अजित पवार हेच नाही तर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे आज माळेगाव कारखाना परिसरात मराठा आंदोलक एकवटले आहेत. त्यामुळे अजित पवार यांचा नियोजित दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.
जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है... एक मराठा लाख मराठा.. आरक्षणाच्या आमच्या हक्काचे. नाही कुणाच्या बापाच.. एक मिशन मराठा आरक्षण.. या मजकुराचे फलक घेऊन मराठा आंदोलक आंदोलन स्थळी जोरदार घोषणाबाजी करत आहे. कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.