Ravindra Dhangekar : ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्यासह पोलीसांवरही मोक्का लावा, आमदार रविंद्र धंगेकर यांची मागणी

पुणे पोलिसांनी (Pune Police) ड्रग माफिया ललित पाटील (Lalit Patil) आणि टोळीवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार मोक्का (MCOCA) कारवाई केली आहे. पण ललित पाटील याला ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) अनेक गोष्टींसाठी मदत करणारे ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 3 Nov 2023
  • 01:20 pm
Ravindra Dhangekar

ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्यासह पोलीसांवरही मोक्का लावा, आमदार रविंद्र धंगेकर यांची मागणी

पुणे : पुणे पोलिसांनी (Pune Police) ड्रग माफिया ललित पाटील (Lalit Patil) आणि टोळीवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार मोक्का (MCOCA) कारवाई केली आहे. पण ललित पाटील याला ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) अनेक गोष्टींसाठी मदत करणारे ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर,(Dr. Sanjeev Thakur) त्याला मदत करणारे पोलीस आणि रोझरी स्कूलचे विनय आऱ्हाना (Vinay Arhana) यांनाहीसहआरोपी करून मोक्काअंतर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केली.

धंगेकर म्हणाले की, ससून रुग्णालयामधून ललित पाटील प्रकरणात अनेकांची नावे समोर आली आहेत. तपासादरम्यान पोलीसांनी आरोपींकडून  लाखो रुपये आणि काही किलो सोने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ललित पाटील हा ससून रुग्णालयात उपचार घेत होता त्यावेळी त्या ठिकाणी असणारे डॉक्टर, पोलीस या सर्व यंत्रणांना पैसे किंवा सोने ललित पाटील हा देत होता. तसेच तो तेथूनच अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालवित होता. पंचतारांकित जीवन जगत होता.  ललित पाटील पळून गेल्यानंतर त्यावेळी रुग्णालयात ड्युटीवर असलेल्या पोलिसांवर कारवाई झाली. पण या ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई केली जात नाही.  संजीव ठाकूर यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. ललित पाटील आणि ठाकूर यांची नार्को टेस्ट केली पाहिजे.  सरकार कारवाईबाबत थंड आहे.  जोपर्यंत संजीव ठाकूर यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई होत नाही. तोपर्यंत आवाज उठवत राहणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest