Chandrakant Patil : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सामाजिक कार्यास सर्वतोपरी मदत करणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

अखिल भारतीय मराठा महासंघाचे समाजासाठीचे कार्य उत्तम प्रकारे सुरु असून संघाच्या सामाजिक कार्यास सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

Chandrakant Patil : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सामाजिक कार्यास सर्वतोपरी मदत करणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सामाजिक कार्यास सर्वतोपरी मदत करणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

Chandrakant Patil : अखिल भारतीय मराठा महासंघाचे समाजासाठीचे कार्य उत्तम प्रकारे सुरु असून संघाच्या सामाजिक कार्यास सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. समाज संघटित करत असताना विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याचा संकल्प मोलाचा असल्याचे देखील चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कॅलेंडर प्रकाशनाच्या अनौपचारिक कार्यक्रम प्रसंगी त्यांनी महासंघाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते व महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर, महासंघाचे युवक कार्याध्यक्ष राकेश गायकवाड, सरचिटणीस गणेश मापारी, युवक सरचिटणीस सचिन वडघुले, अनिकेत भगत, उपाध्यक्ष सुधा पाटील, सरचिटणीस भाग्यश्री बोरकर, कसबा अध्यक्ष वैशाली सोनवणेपर्वती उपाध्यक्ष शुक्रा दुर्गे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, आम्ही समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोतच पण त्याच बरोबर रोजगार मेळावा, महिलांसाठी विविध स्पर्धा, उद्योजक मेळावा, व्यवसाय मार्गदर्शन यासारखे उपक्रम राबवत असल्याचे समन्वयक भाग्यश्री बोरकर यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest