भाजपाची पहिली यादी जाहीर, चंद्रकांत पाटील पुन्हा कोथरूडमधून तर चिंचवडमधून शंकर जगताप यांना संधी

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आचारसंहिता जाहीर होऊन निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ जवळ येत आहे. अशातच भारतीय जनता पक्षाकडून ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Sun, 20 Oct 2024
  • 03:54 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आचारसंहिता जाहीर होऊन निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ जवळ येत आहे.   अशातच भारतीय जनता पक्षाकडून ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून , शिवाजीनगर मधून सिद्धार्थ शिरोळे तर पर्वती मधून माधुरी मिसाळ यांना पुन्हा एकदा  संधी  देण्यात आली आहे. 

तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शंकर जगताप यांची तर भोसरी मधून महेश लांडगे यांची  उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दौंड मधून राहुल कुल यांना संधी देण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest