Ajit Pawar : अजितदादांनी माझ्या डोळ्यासमोर मुख्यमंत्री व्हावे, अजित पवार यांच्या आईंची भावना

आता मी ८६ वर्षांची आहे. त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर मुलाने मुख्यमंत्री व्हावे, अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आई आशा पवार (Asha Pawar)यांनी व्यक्त केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sun, 5 Nov 2023
  • 11:48 am
Ajit Pawar

संग्रहित छायाचित्र

बारामती : आता मी ८६ वर्षांची आहे. त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर मुलाने मुख्यमंत्री व्हावे, अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आई आशा पवार (Asha Pawar)यांनी व्यक्त केली.

बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे आज ग्रामपंचायत साठी मतदान झाले. आशा पवार मतदानासाठी आल्या होत्या. त्यांच्यासोबत अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारही मतदानासाठी  आल्या होत्या. मात्र,  डेंगीमुळे आजारी असल्याने अजितदादा मतदानासाठी येऊ शकले नाहीत.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आशा पवार म्हणाल्या,  दादाने माझ्यादेखत मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते. दादावर लोकांचे प्रेम आहे, पण पुढचे काय सांगता येते? सर्वांना वाटते की, दादाने मुख्यमंत्री व्हावे. आता मी ८६ वर्षांची आहे. त्यामुळे माझ्यादेखतच मुलाने मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते. कोणास ठाऊक इच्छा पूर्ण होईल की नाही. लोकांचं काय सांगता येतं?

आशा पवार म्हणाल्या, दादा आजारी आहे, त्याला अशक्तपणा आला आहे. त्यामुळे तो मतदानाला आला नाही. मी १९५७ सालापासून मतदान करतेय. यंदा मतदानासाठी लोकांचा छान प्रतिसाद मिळत आहे. काटेवाडीत पूर्वी काहीच नव्हते. पण आता काटेवाडीत सांगता येणार नाहीत, इतके बदल झालेत. येथील लोकही आमच्यावर प्रेम करतात.

 बारामतीमधील काटेवाडी ग्रामपंचायतीतही अजित पवार गट आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत होत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest