संग्रहित छायाचित्र
संकेत बावनकुळे (Sanket Bawankule) आणि मित्रांनी लाहोरी बारमध्ये बीफ कटलेट खाल्ले असा आरोप सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. त्यावरून संजय राऊत यांनी म्हटले आहे की, संकेत बावनकुळे यांच्या गाडीमध्ये एका लाहोरी बारचं बिल मिळून आलं. त्यामध्ये खाण्या-पिण्याचा उल्लेख आहे. या बिलावर दारू, चिकन, मटणसह बीफ कटलेटचाही समावेश आहे. हिंदुत्व शिकवणाऱ्या लोकांनी बीफ कटलेट खाल्ले आहे. असे असताना भाजप हिंदुत्व शिकवणार का, असा प्रश्न राऊत यांनी विचारला.
राऊत म्हणाले, संकेत बावनकुळे हे स्वत: ड्रायव्हिंग सीटवर बसलेले होते. मात्र, नंतर त्यांना बदलण्यात आलं. तुम्ही त्याला वाचवत आहात. मग कसल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या गोष्टी करता? हॉटेलमधील बिल पोलिसांनी जप्त केलं. तुम्ही बीफ कटलेट खायचं आणि रस्त्यावर लोकांचे बळी घ्यायचे. महाराष्ट्रात काय चाललंय ? कोणत्या प्रकारे देवेंद्र फडणवीस गृहखातं चालवत आहेत? तुम्ही अनिल देशमुखांना अटक करायला निघाले आहात? तुम्ही त्यांच्या अटकेची तयारी करत आहात आणि तुमच्या डोळ्यासमोर एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या मुलाने गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केला. त्याला तुम्ही अभय देता? हे पाप कुठे फेडणार आहात?
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.