अब की बार, भाजपा तडीपार! देशभरात भाजपसाठी 'साऊथ मे साफ और नॉर्थ मे हाफ' अशी स्थिती असल्याचा आदित्य ठाकरे यांचा दावा

भाजप देशभरात चारशे पार, चारशे पार असा नारा देत सुटली आहे. कदाचित हे चंद्रावर चारशे पार करणार असतील. अख्या देशात भाजप दोनशे पारसुद्धा करणार नाही.

देशभरात भाजपसाठी 'साऊथ मे साफ और नॉर्थ मे हाफ' अशी स्थिती असल्याचा आदित्य ठाकरे यांचा दावा

भाजपने विरोधी पक्षांसाठी जॉईन ऑर जेल पर्याय ठेवल्याचा आरोप

भाजप देशभरात चारशे पार, चारशे पार असा नारा देत सुटली आहे. कदाचित हे चंद्रावर चारशे पार करणार असतील. अख्या देशात भाजप दोनशे पारसुद्धा करणार नाही. महाराष्ट्रातील जनतेने ‘अब की बार, भाजपा तडीपार’ करण्याचा निर्धार केला असल्याची टीका शिवसेनेचे (उबाठा) युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मंगळवारी (दि. २३) केली.  

मावळ लोकसभेसाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि शिवसेना (उबाठा) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) यांचा मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या सभेत ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘देशभरात भाजपासाठी आता 'साऊथ मे साफ और नाॅर्थ मे हाफ' अशी स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील जनतेने यावेळी भाजपाला हद्दपार करण्याचे ठरवले आहे.’’

यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन अहिर, मावळचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील आदी प्रमुख नेत्यांसह महाविकास आघाडीतील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शेतकरी कामगार पक्ष व इतर संघटनाचे पदाधिकारी‌ व‌ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, ‘‘भाजपाकडून जनतेत संभ्रम निर्माण करत भिती घातली जात आहे. भाजपाला मतदान न केल्यास तुमचं मत वाया जाईल, असा प्रचार सुरु आहे. पण ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे.’’ तुम्ही भाजपाला आणि गद्दारांना मतदान करणार नाही. तुमचं एक मतही इतिहास घडविणार असून भाजपाला सत्तेतून घालविणार आहे, असा दावादेखील आदित्य ठाकरे यांनी केला.

भाजपाकडून केवळ विरोधी पक्षाच्या नेत्यांना जेलमध्ये टाकले जात आहे. भाजपा हे विरोधी पक्षासाठी एकच पर्याय देत आहेत, तो म्हणजे जाॅईन ऑर जेल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भाजपाकडून आॅफर होती. पण, त्यांनी भाजपाचा पर्याय न स्विकारता जेलमध्ये जाणे पसंत केले. देशात प्रत्येक नागरिक त्रस्त आहे. केंद्रात भाजपा अर्थमंत्र्यानी नवा शोध लावलाय. गरीब, शेतकरी, युवा आणि महिला वर्ग अशा चारच जाती देशात असल्याचे त्यांनी सांगितले. पण, शेतक-यांना हमी भाव नाही, खतांवर जीएसटी लावलीय, अवकाळी, गारपीट झाल्यावर मदत मिळाली नाही. शेतक-यांवर लाठीचार्ज केला, शेतकऱ्यांना अर्बन नक्षली, माओवादी ठरविले जाते. शेतक-यांवर गोळीबार केला, त्यांच्यावर भाजपा नेत्यांनी गाड्या चालविल्या. पण महाविकास आघाडीने दोन लाखाची कर्जमाफी दिली, हा फरक आदित्य यांनी लक्षात आणून दिला.

भाजपा सरकाने दोन कोटी रोजगार दिला नाही. युवक बेरोजगार आहेत. त्यांना नोक-या नाहीत. तळेगावात वेदांत फाॅक्सकाॅन उद्योग आला असता तर एक लाख तरुण-तरुणींना रोजगार मिळाला असता. परंतु, हे सगळे उद्योगधंदे गुजरात पाठविले. महिला सुरक्षित नाहीत. सरकारमधील ज्या मंत्र्यांनी महिलांना शिवीगाळ केली, त्यांना प्रमोशन दिलं जातेय. बिल्किस बानो या महिलेवर अत्याचार केलेल्या आरोपींना शिक्षा मिळत नाही. गरीब हा आणखी गरीब होतोय, त्यामुळे चारही वर्गाला पुढे भाजपचे सरकार परवडणार नाही, असेही आदित्य यांनी सुनावले.

भाजपाचा खोटारडेपणा आता उघड होत आहे...

महागाई वाढलीय, बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये संताप आहे. पेट्रोल-डिझेल, गॅसचे दर वाढले. त्यामुळे शेतकरी, महिला, युवक असो सगळेजण त्रस्त आहेत. दहा वर्षात भाजपचे बहुमतातील सरकार आल्यावर १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात देणार होता, प्रत्येकाला २०२२ पर्यंत घर देणार होता. त्यावर हे भाजपचे नेते बोलत नाहीत.

त्यामुळे भाजपाचा खोटारडेपणा आता उघड होत आहे. भाजपला बहुमत मिळवून संविधान बदलायचे आहे, असे त्यांचेच लोक बोलत आहेत. हे टाळण्यासाठी स्वाभिमानी मतदारांनी भाजप आणि गद्दारांना गाडायचा निर्धार केलाआहे. महाविकास आघाडीला मतदान करुन त्यांचे जास्तीत जास्त प्रतिनिधी संसदेत पाठवा, असे आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी मतदारांना केले.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest