संग्रहित छायाचित्र
वायनाड : राहुल गांधी यांनी वायनाडमधील जागा सोडल्यानंतर तेथे लागलेल्या पोट निवडणूकीमध्ये प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांचा मताधिक्याचा विक्रम मोडत एक नवा विक्रम निर्माण केला आहे. प्रियांका यांना ४ लाख १० हजार ९३१ इतके मताधिक्य मिळविले. त्यांनी सथ्यान मोकेरी कम्यनिष्ट पक्षाचा उमेदवाराचा पराभव केला. मोकेरी यांना २ लाख ११ हजार ४०७ इतकी मते मिळाली. तर भारतीय जनता पक्षाच्या नव्या हरिदास यांना १ लाख ९ हजार ९३९ इतकी मते मिळाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी ३.६५ लाख मतांनी विजयी झाले होते. त्यांना एकूण ६ लाख २२ हजार ३८८ अशी मते मिळविली.
आता प्रियांका गांधी यांनी या आघाडीला मागे टाकत मोठी आघाडी मिळवलीय. वायनाड पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी आणि त्यांचे प्रतिस्पर्धी यांच्यातील मतांचा फरक लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून निवडणूक लढवलेले राहुल गांधी आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त होता. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी यांनी ट्विट करत वायनाडमधील जनतेचे आभार मानले आहेत.
प्रियंका गांधी यांच्या विजयानंतर राहुल गांधी ट्विटमध्ये म्हणतात, “वायनाडमधील माझ्या कुटुंबाने प्रियांकावर विश्वास ठेवल्यामुळे मला खूप अभिमान वाटतो. मला माहित आहे की ती धैर्य, करुणा आणि अतुल समर्पणाने आपल्या प्रिय वायनाडला प्रगती आणि समृद्धीच्या शिखरावर नेईल.”
दरम्यान विजयानंतर प्रियांका गांधी यांनी वायनाडच्या जनतेचे आभार मानले आहेत. ‘वायनाडच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. काळाच्या ओघात हा विजय तुमचा विजय आहे, याची तुम्हाला जाणीव होईल आणि तुम्ही तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडलेली व्यक्ती तुमच्या आशा-स्वप्ने समजून घेईल आणि तुमच्यासाठी लढेल, याची मी खात्री करून देते. संसदेत तुमचा आवाज होण्यासाठी मी उत्सुक आहे.’
पुढे प्रियंका गांधी म्हणाल्या की, ‘मला हा सन्मान दिल्याबद्दल आणि त्याहीपेक्षा तुम्ही मला दिलेल्या अपार प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. यूडीएफमधील माझे सहकारी, संपूर्ण केरळमधील नेते, कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि माझ्या कार्यालयातील सहकारी ज्यांनी या मोहिमेत प्रचंड मेहनत घेतली, आपल्या पाठिंब्यासाठी, दिवसाला १२ तासांचा (अन्न नाही, विश्रांती नाही) गाडीचा प्रवास सहन केला आणि त्या आदर्शांसाठी खऱ्या सैनिकांप्रमाणे लढा दिला, आपण सर्वजण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्यांचे खूप खूप आभार. तुम्ही मला जे प्रेम आणि धैर्य दिले आहे त्याबद्दल कोणतीही कृतज्ञता कधीही पुरेशी ठरणार नाही. आणि माझा भाऊ राहुल, तू त्या सर्वांमध्ये सर्वात धाडसी आहेस. मला मार्ग दाखवल्याबद्दल आणि मला नेहमीच पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद!