संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर यावर्षी वेस्टन डिस्टबन्समुळे उशिरा बर्फवृष्टी सुरू झाली आहे. परंतु जेव्हा बर्फवृष्टी सुरू झाली तेव्हा ती मोठ्या प्रमाणात होत आहे. जम्मु कस्मीर सोबतच हिमाचल प्रदेश आणि लडाखमध्येही बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. हिमाचलमधील कुल्लू जिल्ह्यातील रोहतांग पास आणि अटल बोगद्याजवळ रविवारी बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणावर झाली. हिमालयात पडणाऱ्या बर्फवृष्टीमुळे उत्तरभारतामध्ये थंडीची लाट पसरणार आहे. त्याबरोबर पश्चिम किनारपट्टी सहयाद्रीच्या डोंगररांगा, डेक्कन प्लॅटोचा भाग मध्यमहाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर थंडीची लाड येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रविवारी कुपवाडा, गुलमर्ग, जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा आणि लडाखच्या लेहमध्ये बर्फवृष्टी झाली. सोमवारीही तिन्ही राज्यांमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये या दोन्ही राज्यातील अनेक शहरातील तापमान ७ अशांपर्यंत खाली उतरले आहे. छत्तीसगडमधील अंबिकापूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमान १० अंशाच्या खाली नोंदवण्यात आले.
मध्यप्रदेश व राज्यस्थान वाहणाऱ्या बर्फाळवाऱ्यामुळे थंडी वाढत आहे. उत्तरेकडील राज्यांबरोबरच बिहार, छत्तीसगड आणि उत्तरांचल मध्येही थंडी सातत्याने वाढत आहे. देशातील ८ राज्यांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. यामध्ये पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्लीचा समावेश आहे. पर्वतांव पर्वतावरील बर्फ वितळल्याने, तेथून येणारे बर्फाळ वारे आणि १२ किमीवर वाहणारे थंड वारे यामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये थंडी वाढत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.
पुढील दोन-तीन दिवस अशा कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळण्याची आशा नाही. ज्या भागात तापमान १० अंशांपेक्षा कमी आहे, तेथे थंडी कायम राहणार आहे. ईशान्येला मुसळधार पाऊस, दक्षिणेत कमी हिवाळा अशी परिस्थिती होती परंतु मध्य भारतामधील हवामान खूप वेगाने बदलत आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा कालावधी कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये शुक्रवारी जोरदार वारा आणि विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. प्रभाव उत्तर भारतातील राज्यांपेक्षा कमी आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमध्ये गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी रात्रीपासून येथे पाऊस थांबला आहे. 25 नोव्हेंबरपासून दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. मध्य प्रदेशामध्ये मागील ३ दिवसांपासून कडाक्याची थंडी आहे. गेल्या ३६ वर्षानंतर भोपाळमध्ये सर्वात कमी तापमान नोंदवले गेले आहे.