संग्रहित छायाचित्र
जयपूर : आसमान से गिरे और खजूरमें अटके असा अनुभव जयपूर -डेहराडूनच्या प्रवासी विमानातील प्रवाशांना आज आला. कारण जयपूरहून डेहराडूनला निघालेले हे इंडिगो एअरलाइन्सच्या (६ई-७४६८) या विमानाचे इंजिन १८ हजार फुटांवर निकामी झाले. यावेळी विमानात एकूण ७० प्रवासी होते.
तांत्रिक बिघाडामुले या विमानाचे दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने विमान सुमारे ३० मिनिटे हवेतच घिरट्या मारत होते. विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
इंडिगो एअरलाइन्सचे फ्लाइट १९ नोव्हेंबर रोजी जयपूर विमानतळावरून संध्याकाळी ५.५५ वाजता डेहराडूनसाठी टेक ऑफ करणार होते, परंतु तांत्रिक कारणांमुळे विमानाने ४० मिनिटे उशिरा ६.३५ वाजता डेहराडूनसाठी उड्डाण केले. सुमारे २५ मिनिटांनंतर विमानाचे इंजिन बिघडले. वैमानिकाने एअर दिल्लीच्या ट्रॅफिक कंट्रोल सिस्टमशी (एटीसी) संपर्क साधला आणि विमानाच्या आपत्कालीन लँडिंगसाठी परवानगी मागितली. सुमारे ३० मिनिटांनंतर एटीसी दिल्लीने इमर्जन्सी लँडिंगला परवानगी दिली.
रात्री ८.१० च्या सुमारास विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. यावेळी प्रवाशाचा श्वास कोंडत होता. सर्व प्रवाशांना विमानतळ टर्मिनलवर सुखरूप आणण्यात आले. त्यानंतर त्याला दुसऱ्या विमानाने डेहराडूनला पाठवण्यात आले. इंडिगोचे जयपूर-डेहराडून फ्लाइट ६ई-७४६८ चे एटीआर टर्बोप्रॉप विमान (व्हिटी-आयआरए) इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ते दिल्लीकडे वळवण्यात आले, असे दिल्ली विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.