संग्रहित छायाचित्र
अनेक वर्षांपासून जम्मू आणि काश्मीर खोऱ्यामध्ये शांतता राहावी यासाठी प्रयत्न चालू आहेत. बऱ्याचदा दहशतवाद्यांना काश्मिर खोऱ्यातूनच मदत मिळत असते. अनेकदा असे घटक दहशतवाद्यांना आपल्या घरांमध्ये आश्रय देऊन त्यांना पोसण्याचे कामच करीत असतात. परंतु आता दहशतवाद्यांना आश्रयदात्यांना कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
कारण अशा देशविघातक लोकांच्या मालमत्ता जप्तकरण्याची मोहिम सरकारने सुरू केली आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) जम्मू-कश्मीर पोलिस व सुरक्षा दलांच्या संयुक्त मोहिमेमध्ये दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची मोहिम सुरू करण्यात आली. आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये रहिवासी नसलेल्यांवर सातत्याने हल्ले करणारे दहशतवादी व त्यांच्या पाठराख्यांची आता खैर नाही. दहशतवाद्यांना आश्रय देणारे, मदत करणाऱ्यांना कठोर शिक्षेसोबतच त्यांच्या मालमत्ताही गमवाव्या लागू शकतात. एनआयएने अतिरेक्यांची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी जम्मू-काश्मीर पाोलिस व इतर सुरक्षा दलाच्या सहकार्याने विशेष संयुक्त मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार पाकिस्तानातून घुसखोरी करून भारतात येणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांची मालमत्ता जप्त केली जाईल.
यशिवाय जे जम्मू-काश्मीरचे नागरिक नाहित अशा लोकांना लक्ष करून त्यांच्यावर हल्ले करणाऱ्यांवरदेखील या मोहिमेत कारवाई होणार आहे. एआयएने या मोहिमेची सुरवात याच वर्षी फेब्रुवारीत श्रीनगरच्या शाला कदर भागात पासून केली. दोन व्यक्तींच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेला लष्कर ए तैयब्बाचा दहशतवादी आदिल मंजूर लंगू याची श्रीनगरच्या जलदागर या ठिकाणी असलेली जमिन व घर युएपीए कायद्या अंतर्गत जप्त करण्यात आली. याबरोबरच दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देऊन आश्रय देणारे त्यांना पैशांची-वस्तुंची रसद पुरवणारे अशा ४ जणांची मालमत्तादेखील जप्त करण्यात आली.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी उत्तर काश्मीरच्या हंदवाडा येथील सुपनगामा येथील रहिवासी दहशतवादी अब्दुल मजील मल्ला व अब्दुल रशीद मीर, मंडिगाम हंदवाडाचा दहशतवादी अर्शद अहमद परे, पालपोराचा दहशतवादी सज्जाद अहमद बटच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली. एनआयएने त्यांची १० कोटी रुपये किमतीची जमीन जप्त केली आहे. हे चारही जण दहशतवाद्यांचे हँडलर आहेत. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी गेल्या काही महिन्यांत पुन्हा घुसखोरीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली आहेत.