रांची : पहिल्या टप्प्यात झारखंडमध्ये १३ टक्के मतदान

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया बुधवार (दि. १३) राेजी पार पडली. झारखंड विधानसभा निवडणूक इंडिया आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी अशा दोन्ही आघाड्यांमध्ये अत्यंत चुरशीची लढत होत आहे

झारखंड :  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया बुधवार (दि. १३) राेजी पार पडली. झारखंड विधानसभा निवडणूक इंडिया  आणि  राष्ट्रीय लोकशाही आघाडी अशा दोन्ही आघाड्यांमध्ये अत्यंत चुरशीची लढत होत आहे. भाजपाने केलेल्या जोरदार टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर, आरोपांच्या फैरी आदींनी निवडणूक प्रचाराचा पहिला टप्पा गाजला.

पहिल्या टप्प्यात ४३ जागांसाठी तर उर्वरित ३८ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील सकाळच्या सत्रात आतापर्यंत १३.४ टक्के मतदान झाले आहे.दरम्यान, ‘झारखंडमध्ये आदिवासींची लोकसंख्या झपाट्याने घटत आहे.

येथे भाजपाचे सरकार आल्यास घुसखोरांची ओळख पटवून त्यांना हुसकावून लावण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल तसेच त्यांनी बळकावलेल्या जमिनीवर पुन्हा दावा केला जाईल, आदिवासी महिलांशी विवाह करणाऱ्या घुसखोरांना जमिनीचे हस्तांतरण रोखण्यासाठी कायदा आणला जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest