मथुरा : इंडियन ऑइल रिफायनरीमध्ये स्फोट जीवितहानी नाही आठ जण जखमी

मथुरा जिल्ह्यातील आग्रा-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या रिफायनरीमध्ये मंगळवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटात किमान आठ जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

मथुरा जिल्ह्यातील आग्रा-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या रिफायनरीमध्ये मंगळवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटात किमान आठ जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

रिफायनरीच्या जनसंपर्क अधिकारी रेणू पाठक यांनी सांगितले की, ४० दिवस बंद राहिल्यानंतर मुख्य प्लांट पुन्हा सुरू करत असताना रात्री साडेआठच्या सुमारास हा स्फोट झाला. अटमॉस्फियर व्हॅक्यूम युनिट पुन्हा सुरू करताना ही आग अचानक लागली. आगीमुळे भट्टीचा स्फोट झाल्यामुळे हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.

रिफायनरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोनू कुमार यांनी सांगितले की, रात्री साडेआठ  ते नऊ वाजेदरम्यान स्फोटाचा आवाज ऐकू आला आणि मुख्य प्रकल्पाजवळील अनेक कामगार जखमी झाले. रिफायनरीच्या अग्निशमन यंत्रणेने सुरुवातीला आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आग आटोक्यात आणण्यात यश आल्यावर त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना माहिती दिल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज दूरदूरवर ऐकू आला. प्रकल्पामध्ये वायू गळतीमुळे स्फोट झाल्याचेही सांगितले जाते. मथुरा रिफायनरीच्या एबीयू प्लांटमध्ये चाळीस दिवसांचा शटडाऊन सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व काही ठीक असल्याचे निश्चित झाल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यात आले. त्यात लिकेज झाल्याचा अंदाज आहे आणि भट्टी फुटल्याने हा मोठा स्फोट झाला, त्यानंतर प्लांटला आग लागली. प्लांट बंद झाल्यानंतर स्टार्टअप उपक्रम सुरू असताना आग लागली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest