हिंमत असेल तर मौलवींना सल्ला द्या, योगींवरील टीकेनंतर भाजपकडून खर्गेंवर कठोर प्रहार; संविधान बचाव संमेलनानंतर काँग्रेस-भाजपमध्ये कलगीतुरा

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापू लागले आहे. मुंबईत आयोजित संविधान बचाव संमेलनात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी योगी आदित्यनाथ यांच्या वेषभूषेवर केलेल्या टीकेला आता भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापू लागले आहे. मुंबईत आयोजित संविधान बचाव संमेलनात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी योगी आदित्यनाथ यांच्या वेषभूषेवर केलेल्या टीकेला आता भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हिंदूंच्या श्रद्धास्थानावर बोलता, हिंमत असेल तर खर्गेंनी मौलवींना राजकारणात हस्तक्षेप करू नये, असा सल्ला द्यावा, अशा शब्दांत भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.    

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराचा हा शेवटचा आठवडा असून २० तारखेला मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. कधी ते राज्यातील नेत्यांबाबत असतात तर कधी केंद्रीय नेतृत्वाबाबत. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या ‘संविधान बचाव संमेलना’मध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या भाषणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व भाजपा नेते योगी आदित्यनाथ यांच्यावर मिश्किल भाष्य करत भाजपाला लक्ष्य केले.  त्यावर भाजपनेही प्रत्युत्तर दिल्यामुळे यावरून दोन्ही राष्ट्रीय पक्षांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले मल्लिकार्जुन खर्गे?
योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख करत अशा लोकांनी एकतर पांढरे कपडे घालावेत किंवा राजकारण सोडावे, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. एक कुणीतरी नेते साधूच्या वेशात राहतात. पण चांगले राजकारणी झाले आहेत. मुख्यमंत्रीही झाले आहेत. ते भगव्या रंगाचे कपडे परिधान करतात. डोक्यावर केसही ठेवत नाहीत. असे एक नेते आहेत, ज्यांना भाजपने जन्माला घातले आहे. ठीक आहे. आम्हाला त्याबाबत काही तक्रार नाही. माझे भाजपला एवढेच म्हणणे आहे की एकतर त्यांना पांढरे कपडे परिधान करायला लावा. पण जर तुम्ही संन्याशासारखे भगव्या रंगाचे कपडे परिधान करणार असाल तर मग राजकारणातून बाहेर व्हा. तुम्ही भगवे कपडे परिधान करून राजकारणी होणार असाल तर मग त्या कपड्यांचे पावित्र्य काय राहिले? एकीकडे तुम्ही भगव्या रंगाचे कपडे परिधान करता आणि दुसऱ्यांवर टीका करता. बटेंगे तो कटेंगे म्हणता. मग संन्याशासारखे कपडे का परिधान करता? तुमचे काम आहे सगळ्यांना एकत्र करणे, जोडणे, सगळ्यांशी प्रेमाने बोलणे. हे आरामात मोठमोठ्या गाड्या घेऊन फिरतात आणि गरिबांबद्दल बोलतात. लोकांमध्ये विष पसरवण्याचे आणि तोडण्याचे काम करत आहेत. त्यामुळे यांच्यापासून सावध राहणे गरजेचे आहे, असे खर्गे म्हणाले. अशा लोकांना निवडणुकीत पराभूत करून जर घरात बसवले नाही तर आपल्या संविधानाच्या ठिकाणी मनुस्मृती येईल आणि हे त्याचे महंत बनून बसतील, असेही खर्गे म्हणाले.

मशिदीतून फतवे काढणाऱ्यांना आवरा
दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गेंच्या या टीकेवर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. कपड्यांचा विषय असेल तर खर्गे मौलवींबाबत का बोलत नाहीत? असा मुद्दा भाजपने उपस्थित केला आहे. हा काँग्रेसचा खरा डीएनए आहे. तो हिंदूविरोधी आणि सनातन विरोधी आहे. आता काँग्रेस पक्षाचे असे म्हणणे आहे की, जे कुणी भगव्या रंगाचे कपडे परिधान करतात, त्यांनी राजकारणात येऊ नये. पण मग हीच बाब ते मौलाना आणि मौलवींबाबत म्हणतात का? याच काँग्रेसने भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद हे शब्द वापरले होते. पण ते हे इतर धर्मांबाबत म्हणत नाहीत. ही काँग्रेसची जातीयवादी विचारसरणी आहे. त्यांना बटेंगे तो कटेंगे जातीयवादी वाटते आणि व्होट जिहाद धर्मनिरपेक्ष वाटते.  त्यामुळेच ते अशी विधाने करत आहेत. साधू राजकारणात नको असतील तर खर्गे यांनी मशिदीतून मतदानाचे फतवे काढणाऱ्यांना आवरावे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest