संग्रहित छायाचित्र
गुड्डू भैय्या आणि गोलूने मुन्ना भैय्याची हत्या केल्यावर आता कालीन भैय्या बदला घेणार का? त्यांची मुख्यमंत्री असलेली सून काय भूमिका घेणार याची उत्तरे प्रेक्षकांना 5 जुलै रोजी मिळणार आहेत. या दिवशी मिर्झापूर वेब सिरिजचा तिसरा भाग येणार आहे. (Mirzapur Season 3)
'मिर्झापूर' वेबसीरिजने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 2020 साली मिर्झापूरचा दुसरा सीझन रिलीज झाला होता. त्यानंतर तिसऱ्या सीझनची सर्वांनाच उत्सुकता होती. दुसऱ्या सीझनच्या शेवटी गुड्डू भैय्या आणि गोलू मुन्ना भैय्याची हत्या करतात. यामध्ये कालीन भैय्या वाचतात. आता पुढे काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. मिर्झापूरच्या गादीवर नक्की कोण बसणार याची उत्तरे मिळणार आहेत.
मिर्झापूर 3' चा टीझरही रिलीज झाला आहे. गुड्डू भैय्या आणि कालीन भैय्या दोघांमध्ये भयानक युद्ध रंगणार आहे. कालीन भैय्या मुन्ना भैय्याच्या हत्येचा बदला कसा घेतात आणि गुड्डू भैय्याची मिर्झापूर मधली दहशत बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
एक्सेल मीडिया एंटरटेन्मेंटद्वारा निर्मित मिर्झापूर भाग 3 मध्ये मुन्नाभैय्या म्हणजेच अभिनेता दिव्येंदू शर्मा दिसणार नाही. सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल, विजय वर्मा, ईशा तलवार, शीबा चड्डासह अनेक कलाकारांची भूमिका आहे. अमेझॉन प्राईमवर सीरिज रिलीज होणार आहे.