वेदांत आहे तरी कोण?

अजय देवगण व काजोल यांची कन्या निसाचे सोशल मीडियावर चांगलेच चाहते आहेत. बॉलिवूडमध्ये तिचे पदार्पण झाले नसले तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने ती कायम चर्चेत असते. बऱ्याचदा निसाचे मित्रांबरोबरच्या पार्टीचे फोटो व्हायरल होतात. अशाच फोटोतून वेदांत महाजन हे नाव चर्चेत आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sun, 11 Jun 2023
  • 09:33 am
वेदांत आहे तरी कोण?

वेदांत आहे तरी कोण?

अजय देवगण व काजोल यांची कन्या निसाचे सोशल मीडियावर चांगलेच चाहते आहेत. बॉलिवूडमध्ये तिचे पदार्पण झाले नसले तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने ती कायम चर्चेत असते. बऱ्याचदा निसाचे मित्रांबरोबरच्या पार्टीचे फोटो व्हायरल होतात. अशाच फोटोतून वेदांत महाजन हे नाव चर्चेत आले. वेदांत महाजन हा निसाचा बॉयफ्रेंड असल्याची चर्चा आहे.  अद्याप या दोघांनीही याबद्दल काही भाष्य केलेले नाही. त्यामुळे निसाचा कथित बॉयफ्रेंड वेदांत महाजन आहे तरी कोण याची अनेकांना उत्सुकता आहे. २५ वर्षीय वेदांत महाजन उद्योजक असून तो त्याचे मित्र माणक धिंग्रा आणि मोहित रावल यांच्यासह एमव्हीएम एंटरटेन्मेंट या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा सह-मालक आहे. ते तिघे मुंबई, दिल्ली आणि लंडनमध्ये क्लब पार्टीचे आयोजन करतात. अशा पार्टीमध्ये जान्हवी कपूर, अहान शेट्टी, माहिका रामपाल, आर्यन खान आणि निसा देवगण यांच्यासह अनेक स्टार किड्स सहभागी झालेले असतात.

वेदांत आणि त्याच्या दोन मित्रांनी सलग तीन वर्ष शाळेतील मित्रांसाठी टेरेसवर नवीन वर्षाच्या पार्टीचे आयोजन केले होते. त्याचे कारण म्हणजे क्लबमध्ये त्यांना प्रवेश मिळत नव्हता. या अनुभवाच्या आधारे मुंबईमधील क्लब आणि हॉटेलनी त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हापासून ते बिग बजेट पार्टींचे आयोजन करत आहेत. वेदांतने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबरचे फोटो शेअर केले असून निसाबरोबरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर दिसतात. एका पार्टीतील फोटोनंतर निसा व वेदांत एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

वेदांतने लंडनमध्ये नाइटक्लबसाठी पार्टी आयोजनास सुरुवात केली. रणवीर सिंग, कनिका कपूर, इम्रान खान, डिव्हाईन, तेशर, रित्विज, गॅरी संधू आणि रॅमोन रोचेस्टर आदी अनेक सेलिब्रिटींनी त्यात परफॉर्म केले आहे.

वेदांत एका मुलाखतीत म्हणाला होता की, तीन तासांचा कार्यक्रम तुम्ही इंटरनेटवर पाहता, तो खूप ग्लॅमरस असतो, पण खूप कमी लोकांना आमच्या कामाची आणि तणावाची कल्पना असते. त्या तीन तासांसाठी आम्हाला कधी कधी एक आठवडा, तर कधी महिनाभर तयारी करावी लागते. लाइटपासून संगीतापर्यंत सर्व काही ठरवून त्याची अंमलबजावणी करणे, तेथील कर्मचारी आणि येणाऱ्या लोकांचे आरोग्य, सुरक्षा ही माझी जबाबदारी असते. त्यामुळे कामाचा खूप तणाव असतो.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story