लालबागच्या राजाच्या मंडपात सिमरनसोबत गैरवर्तन

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कुमकुम भाग्य’मधील अभिनेत्री सिमरन बुधरूप नुकतीच लालबागच्या राजाच्या मंडपात बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचली होती. तेथे तिला गैरवर्तनाला सामोरे जावे लागले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 14 Sep 2024
  • 04:05 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कुमकुम भाग्य’मधील अभिनेत्री सिमरन बुधरूप नुकतीच लालबागच्या राजाच्या मंडपात बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचली होती. तेथे तिला गैरवर्तनाला सामोरे जावे लागले.

सिमरनने तिच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने लिहिले की, ‘‘मंडपात बाप्पाच्या दर्शनाचा अनुभव खूपच निराशाजनक होता. बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आईसोबत लालबागचा राजा येथे गेले होते, तिथे कर्मचाऱ्यांची वागणूक खूपच वाईट होती.’’

सिमरनने शेअर केलेल्या फोटोमध्ये हाणामारी स्पष्टपणे दिसून येते. सिमरनने सांगितले की, ‘‘१२ सप्टेंबरला मी माझे सहकारी कलाकार (मोहित, मायरा आणि अक्षय) आणि आईसोबत लालबागचा राजा येथे गेलो होतो. माझी आई फोटो काढत असताना एका बाउन्सरने तिचा फोन हिसकावून घेतला. आईने फोन परत घेण्याचा प्रयत्न केला असता तिला धक्काबुक्की करण्यात आली. मी मध्यस्थी केली असता त्यांनी माझ्याशीही गैरवर्तन केले. मी संपूर्ण घटना रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला असता त्याने माझा फोन हिसकावून घेतला आणि ‘तुझी आई काही विशेष नाही,’ असे सांगितले. मात्र, जेव्हा त्यांना कळले की मी अभिनेत्री आहे आणि त्यांची कृती मीडियात येऊ शकते, तेव्हा त्यांनी माघार घेतली.’’

 देवाच्या कृपेने मला किंवा माझ्या आईला दुखापत झाली नाही. पण त्या घटनेनंतर मी खूप रडले. तेवढ्यात काही लोक तिथे आले आणि मला विचारले तू ठीक आहेस ना? तुमच्यासोबत जे काही घडले त्याचे व्हिडीओ आम्ही रेकॉर्ड केले आहेत, कदाचित ते तुम्हाला उपयोगी पडेल, त्यांनी मला हा व्हिडिओ दिला आहे. मी अभिनेत्री नसतानाही १९ तास रांगेत उभी राहायचे.

पण माझा मुद्दा असा आहे की लोक जर दुरून श्रद्धेने येत असतील तर त्यांना नीट वागणूक देण्याची जबाबदारी तिथल्या कर्मचाऱ्यांची आहे., याकडेही सिमरनने लक्ष वेधले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest