File Photo
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण नुकतीच आई झाली आहे. दीपिका आपल्या मुलीचे संगोपन करण्यासाठी ऐश्वर्या राय बच्चनच्या पावलावर पाऊल टाकणार आहे. ती तिच्या मुलीसाठी आया ठेवणार नाही तर तिला स्वतः वाढवेल. ऐश्वर्याने तिची मुलगी आराध्यालाही आयाचा आधार न घेता वाढवले आहे. याबरोबरच दीप-वीर दाम्पत्याने आपल्सा मुलीसाठी ‘नो-फोटो पाॅलिसी’ राबवण्याचे ठरवले आहे.
बॉलीवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, आया नसण्याव्यतिरिक्त, रणवीर आणि दीपिका हे विरुष्का (विराट कोहली-अनुष्का शर्मा) यांच्याप्रमाणे मुलीसाठी नो-फोटो पाॅलिसी स्वीकारतील. ते आपल्या मुलीला मीडियापासून दूर ठेवणार आहेत. योग्य वेळ आल्यावरच तिला जगासमोर आणण्याचा निर्णय दीप-वीर यांनी घेतला आहे.
दीपिकाला ७ सप्टेंबर रोजी मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी तिने मुलीला जन्म दिला. या जोडप्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आनंदाची बातमी देत त्याची अधिकृत घोषणा केली होती. दीपिका-रणवीरच्या सोशल मीडिया पेजवर ‘वेलकम बेबी गर्ल’ अशी पोस्ट करून त्यांनी मुलीच्या जन्माबाबत माहिती दिली होती.
दीपिकाने २०१८ मध्ये रणवीरसोबत लग्न केले. दोघांची पहिली भेट 'गोलियों की रासलीला - रामलीला' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. एकत्र काम करत असताना दोघेही प्रेमात पडले आणि पाच वर्षांच्या नात्यानंतर दोघांनी लग्न केले. दीपिका आणि रणवीर 'गोलियों की रासलीला - रामलीला', 'पद्मावत', 'बाजीराव मस्तानी' आणि '८३'मध्ये एकत्र दिसले आहेत. याशिवाय दीपिकाने रणवीरच्या 'सर्कस' चित्रपटातही कॅमिओ केला आहे.