विद्वत्ता आणि कला यांतील द्वंद्व

फुलवंती चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी या कलाकारांनी एक मुलाखत दिली. त्यावेळी गश्मीरने त्याचे पात्र नेमके कसे आहे, काय भूमिका आहे याबद्दल खुलासा केला आहे. गश्मीर म्हणाला की, व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री असे त्यांचे पूर्ण नाव आहे.

प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी

फुलवंती चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी या कलाकारांनी एक मुलाखत दिली. त्यावेळी गश्मीरने त्याचे पात्र नेमके कसे आहे, काय भूमिका आहे याबद्दल खुलासा केला आहे. गश्मीर म्हणाला की, व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री असे त्यांचे पूर्ण नाव आहे.

पेशव्यांच्या दरबारातील वेदांत सूर्य व खूप मोठे पंडित म्हणून त्यांचा उल्लेख होतो. विद्वत्ता आणि कला यांतील द्वंद यावर आधारितच हा चित्रपट आहे. कलेची बाजू फुलवंती सांभाळते आणि विद्वत्तेच्या बाजूला व्यंकटशास्त्री आहेत. पुढे बोलताना तो म्हणाला की, भूमिकेविषयी जास्त काही सांगू शकत नाही. पण दोन गोष्टी प्रामुख्याने सांगाव्याशा वाटतात आणि त्या म्हणजे एक तर मला अशा रोलमध्ये बघणे,  जी माझी अशी इच्छा होती की कोणीतरी करावे. 

व्यक्तिमत्त्व आणि आक्रमक अशा भूमिकांसाठी मला सतत बघितले जाते,  तशी कल्पना केली जाते. तर मला असे वाटायचे की, मराठी चित्रपटसृष्टीत असे कोणी नाही का की, ज्याला यापलीकडे बघता यावे.  मी त्याची वाट बघत होतो. मी स्वत: विचार करून मग शेवटी काही लेखकांबरोबर स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली की, आता वेगवगळ्या भूमिका करण्याची वेळ आली आणि तेवढ्यात मला या भूमिकेसाठी विचारणा झाली.

या चित्रपटाची संपूर्ण स्क्रिप्ट ऐकल्यानंतर पहिल्यांदा असे झाले की, यात कुठेच काहीच चुकले नाही. अक्षरश: ज्या पद्धतीच्या पात्राची मी वाट पाहत होतो, असे पात्र साकारायला मला आवडेल ती ही भूमिका आहे. या चित्रपटात एका वेगळ्या पद्धतीची, लोकांना आश्चर्यचकित करणारी भूमिका दिसेल.

प्राजक्ताने गश्मीरच्या भूमिकेविषयी बोलताना म्हटले, “हे पात्र गश्मीरशिवाय कोणीच साकारू शकले नसते. इतके ते त्याच्यासाठी बनलेले आहे. चित्रपट पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला हे समजेल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story