मल्लिका शेरावतला नकोसा अनुभव

बाॅलिवूडमध्ये एकेकाळी ‘सेक्स सिम्बाॅल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मल्लिका शेरावतने चित्रपटाच्या सेटवर एका हिरोने तिला दिलेल्या त्रासाचा अनुभव शेअर केला आहे. हा व्हीडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Mallika Sherawat,viral,sex symbol,Bollywood,harassed

File Photo

बाॅलिवूडमध्ये एकेकाळी ‘सेक्स सिम्बाॅल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मल्लिका शेरावतने चित्रपटाच्या सेटवर एका हिरोने तिला दिलेल्या त्रासाचा अनुभव शेअर केला आहे. हा व्हीडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  बॉलीवूडमध्ये एकेकाळी मल्टीस्टारर विनोदी चित्रपटांचा ट्रेंड होता. अभिनेत्री मल्लिका शेरावतने अशा बऱ्याच मल्टीस्टारर कॉमेडी चित्रपटांत काम केलं आहे. तिचा ‘विकी विद्या का वोह वाला वीडियो’ हा आगामी चित्रपटसुद्धा एक मल्टीस्टारर कॉमेडी सिनेमा आहे. याच सिनेमाच्या प्रदर्शनाच्या आधी, मल्लिका शेरावतने एका चित्रपटाच्या सेटवर झालेल्या त्रासाचा अनुभव सांगितला.

मल्लिका म्हणाली, ‘‘हा प्रसंग दुबईमध्ये एका मल्टीस्टारर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडला. यामध्ये मी विनोदी भूमिका साकारली होती. हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तो चित्रपट होता सुपरहिट ठरला होता. प्रेक्षकांना तो खूप आवडला. त्या चित्रपटाचा हिरो रात्री १२ वाजता माझ्या खोलीचं दार ठोठावत असे.’’  

“तो इतक्या जोरात दार ठोठावत असे की एका क्षणी मला वाटलं की तो नायक दरवाजा तोडून आत येईल. त्या हिरोला माझ्या बेडरूममध्ये यायचे होते, पण मी ठामपणे ‘नाही’ म्हटले. त्या घटनेनंतर त्याने कधीच माझ्याबरोबर काम केले नाही,” असे मल्लिकाने सांगितले.

 मल्लिका  लवकरच ‘विकी विद्या का वोह वाला वीडियो’ या चित्रपटात दिसणार आहे. राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. हा कॉमेडी चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून, आलिया भट्टच्या ‘जिगरा’ या अ‍ॅक्शन चित्रपटाशी टक्कर देणार आहे.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story