ती’ सध्या काय करते?

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे, लोकप्रिय नाव म्हणजे दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर. आपल्या कणखर स्वभावासाठी ओळखले जाणाऱ्या महेश मांजरेकर यांचे व्यावसायिक आणि खासगी आयुष्यही चर्चेत असते.

 leading, popular name,Marathi, cinema , Mahesh Manjrekar

File Photo

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे, लोकप्रिय नाव म्हणजे दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर. आपल्या कणखर स्वभावासाठी ओळखले जाणाऱ्या महेश मांजरेकर यांचे व्यावसायिक आणि खासगी आयुष्यही चर्चेत असते. आज मांजरेकर यांच्याकडे फॅमिली मॅन म्हणून पाहिले जाते. त्यांचे कुटुंबासोबतचे फोटो व्हायरल होतात. पण महेश यांची २ लग्न झाली आहेत. मेधा मांजरेकर ही त्यांची दुसरी पत्नी आहे. 

महेश मांजरेकर यांचे पहिले लग्न दीपा मेहता यांच्याशी झाले होते. दीप मेहता या फॅशन डिझाइनर आहेत. दीपा मेहता यांचा अभिनयाशी काहीही संबंध नसला तरी त्या 'क्वीन ऑफ हार्टस' या साड्यांचा ब्रँड चालवतात. त्यांच्या साड्यांना मराठी सृष्टीतूनच नाही तर बॉलिवूड इंडस्ट्रीतही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यांची मुलगी अश्वमी मांजरेकर या ब्रँडसाठी मॉडेलिंगचे कामही करते. अश्वमीसुद्धा अभिनयक्षेत्रात आपले नशीब आजमवत आहे. दीपा मेहता यांच्यापासून महेश यांना सत्या मांजरेकर आणि अश्वमी मांजरेकर ही दोन मुले आहेत. काही कारणामुळे महेश आणि दीपा यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अश्वमी, सत्या महेश मांजरेकर यांच्याकडेच राहतात.दीपा मेहता या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असल्याचे दिसून येते. त्यांची ही दोन्ही मुले आज आपल्या आईकडे राहत असली तरी महेश मांजरेकर यांचाही लळा आहे. त्यामुळे बऱ्याचदा ही मुले महेश मांजरेकर यांच्याकडे राहायला येतात. 

मेधा मांजरेकर या महेश मांजरेकर यांच्या दुसऱ्या पत्नी. मेधा सोबत त्यांचे लव्ह मॅरेज झाले आहे. मेधा आणि महेश मांजरेकर दोघेही एकत्र काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेत संसार थाटला. मेधा सोबत महेश मांजरेकर यांनी आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली. मेधा आणि महेश मांजरेकर यांना सई मांजरेकर ही एक मुलगी आहे. सई मांजरेकरला बॉलिवूडचा गॉडफदार सलमान खाननेच लॉन्च केले होते. सई सलमान खानसोबत 'दबंग ३' सिनेमात झळकली होती. तिच्या भूमिकेलाही रसिकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story