इम्रानला दुखापत

तेलुगू चित्रपट ‘गुडाचारी २’ च्या शूटिंगदरम्यान अभिनेता इम्रान हाश्मीला गंभीर दुखापत झाली होती. मिळालेल्यामाहितीनुसार, स्टंट सीन करताना इम्रानला ही दुखापत झाली.

Imran,injured,Gudachari 2,Actor,stunt scene

Imran khan

तेलुगू चित्रपट ‘गुडाचारी २’ च्या शूटिंगदरम्यान अभिनेता इम्रान हाश्मीला गंभीर दुखापत झाली होती.मिळालेल्यामाहितीनुसार, स्टंट सीन करताना इम्रानला ही दुखापत झाली.  तो स्वतःचे स्टंट करत होता. ते करताना त्याच्या मानेला दुखापत झाली. त्याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 इम्रानचा हा फोटो पाहिल्यानंतर त्याचे चाहते दुःखी झाले. एकाने लिहिले, ‘‘लवकर बरे व्हा.’’ तर दुसऱ्याने लिहिले, ‘‘तुमच्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.’’

बॉलीवूडनंतर इम्रान हाश्मी आता साऊथ चित्रपटांमध्येही आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच हा अभिनेता साऊथचा सुपरहिट चित्रपट 'गुडाचारी'च्या दुसऱ्या भागात दिसणार आहे. तर याआधी तो सलमान खान आणि कतरिना कैफच्या ‘टायगर ३’ या चित्रपटात दिसला होता. यामध्ये त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story