shah rukh khan called himself a gay
आपल्या दमदार अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करणाऱ्या किंग खान चांगलाच चर्चेत आला आहे. त्याची जूनी मुलाखत व्हायरल झाली असून त्यामध्ये त्याने केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शाहरुख खान नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असतो. अनेक अभिनेत्रींसोबत शाहरुखने स्क्रिन शेअर केली. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत शाहरुखच्या लिंकअपच्या चर्चा रंगल्या नाहीत. याच मुद्दयावर शाहरुख काही वर्षापूर्वी बोलला होता ज्याची चर्चा सध्या बॉलीवूडनगरीत रंगली आहे.
काही वर्षापू्र्वी झालेल्या एका मुलाखतीदरम्यान, इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत त्याचं नाव कोणत्याही अभिनेत्रीसोबत का जोडलं गेलं नाही? असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना, शाहरुख म्हणाला, मला असं वाटतं की मी गे आहे. मला अनेकांनी विचारलं आहे तुझ्या नावाची चर्चा कोणत्याच अभिनेत्रीसोबत का रंगली नाही. त्या सर्व माझ्या मैत्रीणी आहे. मी कायम हेच उत्तर देतो… मी त्यांच्यासोबत काम करतो. मी माझ्या पत्नीसोबत खूप आनंदी आहे आणि सर्व मुलींसोबत मी फक्त काम करतो. मी त्या सर्वांवर प्रेम करतो. शुटिंग दरम्यान त्यांच्यासोबत अधिक वेळ देखील व्यतीत करतो. अभिनेत्री माझ्या घरी येतात. मी त्यांच्या घरी जातो. आम्ही एकमेकांना मदत करत असतो. असही यावेळी शाहरुख म्हणाला.
View this post on Instagram
देसी गर्ल प्रियांका चोप्रासोबत जोडले गेले होते शाहरुखचे नाव, पण...
2011 मध्ये शाहरुखचं प्रियांका चोप्रासोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. डॉन सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या जवळीत निर्माण झाल्याचे बोलले जात होते. नाईटक्लब, पार्ट्या आणि अनेक कार्यक्रमांमध्ये दोघे एकत्र स्पॉट झाले होते. त्यामुळं दोघांच्या अफेअरच्या चर्चेला उधाण आलं होतं, पण शाहरुखने या सर्वा चर्चा फेटाळून लावल्या होत्या. रंगणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे शाहरुख स्वतः बोलला होता.
शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता लवकरच ‘किंग’ चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सुहाना खान देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. किंग खान पहिल्यांदा लेकीसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.