संग्रहित छायाचित्र
अभिनेत्री कुनिका सदानंदने गायक कुमार सानूला डेट केले होते. अलीकडेच तिने तिच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. या तिने कुमार सानूच्या पत्नीने तिच्या कारची तोडफोड केल्याचा किस्साही सांगितला.
कुनिकाने अलीकडेच सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीदरम्यान तिच्या आणि कुमार सानूच्या प्रेमकथेबद्दल सांगितले. ती म्हणाली, ‘‘नव्वदच्या दशकात मी सानूला डेट केले होते. जेव्हा त्याच्या पत्नीला माझ्या आणि सानूच्या नात्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा तिने यावर नाराजी व्यक्त केली. रिटाने माझी गाडी हॉकी स्टिकने फोडली होती.’’
सानूसोबत माझी दुसरी भेट उटीमध्ये झाली. मी तिथे शूटिंग करत होते आणि सानू सुट्टीसाठी गेला होता. त्यावेळी सानू आणि त्याची पत्नी रीटा यांच्यात काहीही चांगले चालत नव्हते. त्यांच्या लग्नामुळे तो खूप नाराज होता. एकदा तर दारूच्या नशेत त्याने हॉटेलच्या खिडकीतून उडी मारण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी मी कसे तरी त्याला पडण्यापासून वाचवले. यानंतर आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ आलो, अशी आठवण कुनिकाने सांगितली.
कुनिका पुढे म्हणाली, या ट्रिपनंतर सानू पत्नी रिटापासून वेगळे राहू लागला. तो माझ्या घराजवळच्या इमारतीत शिफ्ट झाला होता. आम्ही दोघांनी एकमेकांना पाच वर्षे डेट केले. आमच्या डेटिंगदरम्यान सानू आणि माझे खूप घट्ट नाते होते. मी त्याच्यासाठी पत्नीप्रमाणे होते, मी त्याला माझ्या पतीप्रमाणे वागवले.
कुनिकासोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वीच सानूने रिटासोबत लग्न केले होते. मात्र, १९९४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. सानूने १९८० मध्ये रिटाशी लग्न केले. त्यांना तीन मुले आहेत. यानंतर १९९४ मध्येच सानूने सलोनी भट्टाचार्यसोबत लग्न केले. सलोनीपासून त्यांना दोन मुली आहेत.