संग्रहित छायाचित्र
आमिर खानची माजी पत्नी आणि निर्माती किरण राव हिने अलीकडेच त्याच्यासोबतच्या नात्याबद्दल सांगितले. ‘स्वदेश’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाल्याचे तिने सांगितले. पण त्यावेळी इंटरनेट नव्हते त्यामुळे बोलण्यात खूप अडचण येत होती.
फिल्मफेअरशी संवाद साधताना किरण म्हणाली, 'मोबाईल आणि इंटरनेटपूर्वी आमच्याकडे बोलण्याचे अनेक मार्ग होते. इंटरनेट सर्वत्र नव्हते त्यामुळे नेटवर्क मिळवण्यासाठी कधी कधी डोंगर चढून जावे लागत असे. खरंतर आमचा रोमान्स 2004 मध्ये ‘स्वदेश’च्या शूटिंगदरम्यान सुरू झाला होता. त्यावेळी मी ‘स्वदेश’चे शूटिंग करत होते आणि तो ‘मंगल पांडे’साठी शूटिंग करत होता. आमिर फारसा फिल्मी नाही. आमच्यात बऱ्याच गोष्टी काॅमन होत्या, त्यामुळे आमच्याकडे बोलण्यासारखे बरेच होते. स्टार असूनही ते सामान्य माणसासारखा वागत होता. शूटिंगदरम्यानही तो पूर्णपणे नॉर्मल राहिला. त्याच्याकडे पाहून जणू काही तो क्रूचा सदस्य आहे असे वाटले.’’
किरण म्हणाली, 'मी आमिरला चांगल्या प्रकारे ओळखत होते. त्यामुळे त्याच्या स्टारडमचा दबाव मला कधीच जाणवला नाही. मी कशी आहे, हे त्याला माहित होतं. मला समजून घेणंही त्याच्यावर अवलंबून होतं. मला वाटते की त्याने माझ्याकडून विशिष्ट पद्धतीने वागण्याची अपेक्षा केली नाही. त्यामुळे कोणतीही अडचण आली नाही, असे किरणने आवर्जून सांगितले.
किरणच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी तिच्याकडे तेवढेही कपडे नव्हते, जेवढे एका पब्लिक फिगरकडे असावे. म्हणून जेव्हा त्यांनी डेटिंग सुरू केली तेव्हा तिला पटकन तिचा वॉर्डरोब बदलावा लागला. तिला फॅशनची आवड असली तरी तिच्याकडे जास्त प्रयोग करण्याएवढे पैसे नसल्यामुळे ती स्वस्त ब्रँड्स किंवा रस्त्यावरच्या बाजारातून खरेदी करायची.
आमिर-किरण यांचे नाते १६ वर्षे टिकले. आमिर आणि किरण यांची भेट २४ वर्षांपूर्वी 'लगान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. किरण या चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शक होती. ‘स्वदेश’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये प्रेम सुरू झाले. दोघांनी डिसेंबर २००५ मध्ये लग्न केले. त्याच्या १६ वर्षांनंतर जुलै २०२१ मध्ये या जोडप्याने घटस्फोट घेतला.