Sonakshi Sinha: ‘पुरे झाले, आता इथून जा...', पापाराझींवर भडकली सोनाक्षी

सोनाक्षी सिन्हा नेहमीच तिच्या कूल नेचरसाठी ओळखली जाते, परंतु नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पापाराझींवर चिडताना दिसून आली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 13 Jan 2025
  • 06:08 pm

Sonakshi Sinha angry

सोनाक्षी सिन्हा नेहमीच तिच्या कूल नेचरसाठी ओळखली जाते, परंतु नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पापाराझींवर चिडताना दिसून आली.

 

 सोनाक्षी अलीकडेच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. तेथे पापाराझी सतत तिचे फोटो क्लिक करत होते. यामुळे ती संतापली. व्हायरल व्हीडीओमध्ये सोनाक्षी कोणाशी तरी बोलत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, पापाराझींनी तिला घेरले आणि तिचे फोटो क्लिक करण्यास सुरुवात केली. पण काही वेळाने सोनाक्षी चिडली आणि पापाराझींना म्हणा, ‘‘पुरे झाले, आता इथून जा, प्लीज जा.’’

 

एखाद्या स्टारने त्याच्या प्रायव्हसीमुळे पापाराझींवर रागावण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, दक्षिण अभिनेत्री कीर्ती सुरेशचादेखील एक व्हीडीओ समोर आला होता. यामध्ये तिच्या टीमचे सदस्य पापाराझींना फटकारताना दिसले होते.  कीर्ती तिच्या कारमध्ये बसली असताना पापाराझी तिचे फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते. यावर कीर्तीच्या टीमचे सदस्य संतप्त झाले आणि त्यांनी त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याबद्दल पापाराझींना फटकारले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by GLAMSHAM.COM (@glamsham)

सोनाक्षीने मागील वर्षी २३ जून रोजी झहीर इक्बालसोबत सिव्हिल मॅरेज केले होते. तिच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर, सोनाक्षी सिन्हा लवकरच ‘निकिता रॉय’ आणि ‘द बुक ऑफ डार्कनेस’मध्ये दिसणार आहे. यामध्ये परेश रावल आणि सुहेल नय्यर मुख्य भूमिकेत आहेत.

Share this story