Actress Monica Dabde
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. मालिकेतील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. टीआरपी यादीतही ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील अर्जुन सायलीनेचं प्रेक्षकांची मनं जिकंली नसून सायलीची नणंद म्हणजेच अस्मिता हीने देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. पण सध्या अस्मिता म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबडे तिच्या खासगी आयुष्यामुळं चर्चेत आली आहे. मोनिकाने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. इतकेच नाही तर अभिनेत्रीचे थाटात डोहाळेजेवण पार पडलं आहे. सध्या तिच्या या सोहळ्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर मोनिकाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती डोहाळजेवणासाठी तयार झाल्याची दिसत आहे. काही महिन्यांपूर्वीच मोनिकाने पतीसोबत काही फोटो शेअर करत आई होणार असल्याचा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला होता. सध्या मोनिकाला सातवा महिना सुरु असून नुकतचं तिच्या डोहाळजेवाणाचा कार्यक्रम पार पडला.
डोहाळजेवणासाठी मोनिकानं खास लुक केला होता. हिरव्या रंगाची साडी परिधान करुन मोनिकाने फुलांचे दागिने, नाकात नथ, हातामध्ये फुलांच्या बांगड्या परिधान केल्या होत्या. तसेच मोनिकाने साडीवर आई असं बॅच लावलं होत. मोनिका या लुकमध्ये खुपच सुंदर दिसत होती. मोनिकाच्या मेकअप आर्टिस्टने तिचा व्हिडीओ शेअर केला असुन चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
View this post on Instagram
शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मोनिकाने अस्मिता या पात्राबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. 'तुम्ही सगळे ‘ठरलं तर मग’मध्ये मला बघतच आहात. मी अस्मिता नावाची भूमिका करतेय. माझं खरं नाव मोनिका दबडे आहे. अस्मिता करताना मला छान मजा येते, तेव्हा मी वेगळ्या रुपात असते. तसंच एक वेगळं रुप मला आज साईने ( मेकअप आर्टिस्ट ) दिलं आहे. आज माझं डोहाळेजेवण आहे, मला सातवा महिना लागला आहे. खूप छान वाटतंय.'
View this post on Instagram
मोनिका मालिकेसोबतच स्वतःचा युट्युब देखील चालवते. तिचं स्वतःच चॅनेल आहे. त्यावर ती वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते.