Shriya Saran : बिनधास्त श्रिया !

श्रिया सरण ही १९९० पासून चित्रपटसृष्टीत असलेली अभिनेत्री सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींमधील एक अभिनेत्री म्हणता येईल. तेलुगू, तामिळी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत तिने आपला दमदार अभिनय दाखवलेला आहे. २००१ मध्ये इष्टमद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या श्रियाचा २००२ मधील नुव नुवे हा चित्रपट सुपरहिट झाला. आतापर्यंत ६१ चित्रपटात काम केलेल्या श्रियाचा फॅशनचा सेन्सही जबरदस्त आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 30 Apr 2023
  • 06:35 pm
 बिनधास्त श्रिया !

बिनधास्त श्रिया !

श्रिया सरण ही १९९० पासून चित्रपटसृष्टीत असलेली अभिनेत्री सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींमधील एक अभिनेत्री म्हणता येईल. तेलुगू, तामिळी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत तिने आपला दमदार अभिनय दाखवलेला आहे. २००१ मध्ये इष्टमद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या श्रियाचा २००२ मधील नुव नुवे हा चित्रपट सुपरहिट झाला. आतापर्यंत ६१ चित्रपटात काम केलेल्या श्रियाचा फॅशनचा सेन्सही जबरदस्त आहे. 

४० वर्षीय श्रियाला आपले इंडस्ट्रीमधील स्थान आणि कोणत्या प्रसंगांना कसे तोंड द्यायचे याची नेमकी कल्पना आहे. एका पत्रकाराने गरजेपेक्षा अधिक काम केल्याने अभिनेत्री श्रिया ओव्हरशेप झाल्याची प्रतिक्रिया नोंदवली होती. त्यावर केवळ अभिनेत्रींनाच असे प्रश्न कसे विचारता असा सवाल करत श्रियाने संबंधित पत्रकाराला खडसावले आहे. हा व्हीडीओ व्हायरल झाला असून श्रियाचा बिनधास्त स्वभाव चाहत्यांना भलताच पसंत पडल्याचे दिसते. श्रियाच्या प्रत्युत्तराबद्दल अनेकांनी तिचे अभिनंदन केले आहे. 

एका पत्रकाराने श्रियाला सोशल मीडियावर असे विचारले की, इतर अभिनेत्रींच्या तुलनेत एवढ्या वर्षांनंतरही तू एवढी फिट कशी राहू शकतेस. यावर दृश्यममधून देशभर लोकप्रिय झालेली श्रिया म्हणते की, हाच प्रश्न तू तेलुगुतील प्रत्येक हिरोला विचारला तर मी तुला या प्रश्नाचे उत्तर देईन. यावर पत्रकाराने मी तुझे अभिनंदन करत होतो असे उत्तर दिले. उत्तर देताना श्रिया म्हणते की, हे अभिनंदन आहे ? मुले झाल्यावर एखाद्या अभिनेत्रीला अशाप्रकारे अभिनंदन केले जात नाही. अनेकजण म्हणतात की, अरे तुम्हाला दोन मुलं आहेत यावर माझा विश्वास बसत नाही.     

पत्रकाराने आपल्या प्रश्नाचे समर्थन चालूच ठेवल्याने श्रिया म्हणते की, अभिनेत्रींना असे प्रश्न विचारताना तुम्हाला स्फूरण चढते. मात्र, नायकांना असे प्रश्न विचारण्याचे तुमच्यात धाडस आहे का ? 

श्रिया आणि तिचा पती आंद्रेई कोश्चीव्ह यांना राधा नावाची सुंदर कन्या एप्रिल २००१ मध्ये झाली. अर्थात, मुलीला सहा महिने झाल्यावर ही बातमी त्यांनी जाहीर केली. एका मुलाखतीत याच बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रिया म्हणाली की, बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांत मातेच्या शरीरात जे बदल होतात, त्याचा मला अनुभव घ्यायचा होता.   

या अगोदर श्रियाचा कब्जा हा चित्रपट आला होता. आगामी एका ॲक्शन चित्रपटात ती मधुमती या नावाच्या नायिकेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात उपेंद्र आणि संदीप किच्चा यांच्या मुख्य भूमिका आहेत. अनेक भाषात तयार होत असलेल्या म्युझिक टीचर या चित्रपटात श्रिया काम करत असून तो चित्रपट पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story