ट्विंकल अद्यापही शिकतेय!

अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना सध्या लंडनच्या गोल्डस्मिथ युनिव्हर्सिटीमधून फिक्शन रायटिंग या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. वयाच्या ४९ व्या वर्षी तिने पुन्हा शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे ती विद्यार्थी जीवन जगत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 12 Jun 2023
  • 03:38 pm
ट्विंकल अद्यापही शिकतेय!

ट्विंकल अद्यापही शिकतेय!

अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना सध्या लंडनच्या गोल्डस्मिथ युनिव्हर्सिटीमधून फिक्शन रायटिंग या  विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. वयाच्या ४९ व्या वर्षी तिने पुन्हा शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे ती विद्यार्थी जीवन जगत आहे.

ट्विंकलने नुकताच एक व्हीडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने कॉलेज लाइफची झलक दाखवली आहे. व्हीडीओमध्ये ट्विंकल तिच्या कॉलेजमध्ये जाताना, मित्रांसोबत कॉफी घेताना आणि तिचा कॉलेज आयडी दाखवताना दिसत आहे. याशिवाय अभिनेत्री कॉलेजच्या इमारतीसमोर पोझ देताना दिसत आहे, ज्याच्या भिंतीवर गोल्डस्मिथ लिहिले आहे.

व्हीडीओ शेअर करताना ट्विंकलने लिहिले ‘‘वयाच्या पन्नाशीत पुन्हा विद्यापीठात जाण्यासारखे काय आहे? ठीक आहे. इथे शिकताना आता मला ९ महिने झाले आहेत. जेव्हा मी इथे प्रवेश घेतला तेव्हा माझ्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. कारण मी माझे मास्टर्स पूर्ण करण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे. कुणाला माहिती होते, मी स्वतःला सबमिशन, ग्रेड आणि कॉफीच्या एक हजार मगच्या माध्यमातून असे पाहू शकेल. कधी कधी वाटते की, लेखनात पदवीऐवजी जीवनातील सर्वात वाईट निर्णय घेण्यात मी मास्टर्स करायला हवे होते.’’

ट्विंकल सध्या लंडनमध्ये मास्टर्सचे शिक्षण घेत आहे. तिचा पती अक्षयकुमार चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. मात्र, कामातून वेळ काढून तो अनेकदा लंडनमध्ये ट्विंकलला भेटायला जातो आणि तिच्यासोबत वेळ घालवतो. या जोडप्याचा मुलगा आरव आणि मुलगी निताराही त्यांना भेटायला येतात.  ट्विंकलने आतापर्यंत 'मिसेस फनीबोन्स', 'द लीजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद' आणि 'पायजामा आर फॉरगिव्हिंग' ही पुस्तके लिहिली आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story