या रविवारी, ‘मॅडनेस मचाएंगे - इंडिया को हसाएंगे!’ हा शो करणार खान बंधू - अरबाज आणि सोहेल यांचे स्वागत!

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या विनोदी शो द्वारे तुमच्या वीकएंडला हास्याचा एक अत्यावश्यक डोस देण्यासाठी सज्ज आहे.

ArbaazandSohailwhowillhost

या रविवारी, ‘मॅडनेस मचाएंगे - इंडिया को हसाएंगे!’ हा शो करणार खान बंधू - अरबाज आणि सोहेल यांचे स्वागत!

 या रविवारी अमर्याद ‘वेडेपणा’ने भरलेल्या एपिसोडचे आश्वासन देत, शो मध्ये अरबाज खान आणि सोहेल खान यांचे स्वागत केले जाईल, जे आपल्या ‘मॅडनेस की मालकिन’ हुमा कुरेशीसोबत सामील होतील आणि प्रतिभावान विनोदवीरांनी सादर केलेल्या काही अनोख्या अॅक्ट्सचा आनंद घेतील.

प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन आणि शोचा होस्ट, हर्ष गुजराल, याने मोठ्या भावंडांसोबत राहण्यासाठी काय काय करावे लागते हे अधोरेखित करणारा अॅक्ट सादर केला आणि भावंडांसोबत येणार्‍या गमतीजमती विनोदी ढंगाने सादर करून सेलिब्रिटी पाहुण्यांना भरपूर हसवले. विनोदी कलाकार हेमांगी कवी आणि कुशल बद्रिके यांनी आपल्या ‘सायलेंट बायको’ या स्किट द्वारे वैवाहिक जीवनातील चढ उतार विनोदी रीतीने प्रस्तुत केले आणि आपल्या विनोदी बुद्धिमत्तेला खान बंधूंकडून दाद मिळवली. पुढे, परितोष त्रिपाठीच्या संघर्ष करणार्‍या पटकथालेखकाच्या चित्रणाचा परिणाम इतका मजेशीर ठरला की पाहुण्यांची हसून हसून पुरेवाट झाली.

‘मॅडनेस मचाएंगे’ मधील कॉमेडीच्या विविधतेबद्दल बोलताना हेमांगी कवी म्हणते, “‘मॅडनेस मचाएंगे-इंडिया को हसाएंगे!’ मध्ये सहभागी होणे हा एक आनंद आहे आणि अशा उत्कृष्ट विनोदवीरांसोबत काम करणे म्हणजे उत्कंठा आणि सर्जनशीलतेच्या अनुभवाला एक अतिरिक्त पदर जोडणे आहे. कुशल बद्रिके सोबत विनोदी स्किट करणे म्हणजे हास्याची दंगलच होती. पती-पत्नीच्या दैनंदिन जीवनातील विनोद आणि त्यातली धमाल प्रस्तुत करण्यात आम्हाला इतकी मजा आली की आम्ही एकत्र केलेला वेडेपणा आणि धमाल प्रेक्षक कधी पाहतात असे मला झाले आहे. विनोदाच्या बाबतीत सांगायचे झाले तर आमच्याकडे स्टँड-अप्स, गिग्स, रोस्ट आणि इतर सर्व काही आहे. तेव्हा थोडासा वेडेपणा आणि अखंड मनोरंजनासाठी सज्ज व्हा!”

 

नक्की बघा, ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या रविवारी रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story