Bhai : सिर्फ भाई हूॅ, आजकल मैं!

बॉलीवूडच्या सुपरस्टार सलमान खान याचा ईदच्या निमित्ताने ‘किसी का भाई, किसी की जान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून लवकरच तो १०० कोटी उत्पन मिळवणाऱ्या चित्रपटांत समाविष्ट होईल. या चित्रपटाचे जागोजाग प्रमोशन केल्यानंतर सलमान दुबईतील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रवना झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 29 Apr 2023
  • 02:42 pm
Naga Chaitanya

सिर्फ भाई हूॅ, आजकल मैं!

बॉलीवूडच्या सुपरस्टार सलमान खान याचा ईदच्या निमित्ताने ‘किसी का भाई, किसी की जान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून लवकरच तो १०० कोटी उत्पन मिळवणाऱ्या चित्रपटांत समाविष्ट होईल. या चित्रपटाचे जागोजाग प्रमोशन केल्यानंतर सलमान दुबईतील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रवना झाला. रजत शर्मा यांच्या ’आप की अदालत‘ या कार्यक्रमात सलमान दिसणार असून यामध्ये तो आपल्या कामाबद्दल तर चर्चा करेलच, शिवाय आपल्या व्यक्तिगत आयुष्याबद्दलही चर्चा करणार आहे. याचा एक टिझर इन्स्टाग्रामवर प्रदर्शित झाला असून त्यात सलमान आपल्या आयुष्यातील प्रेमप्रकरणावर चर्चा करताना दिसत आहे. आपण प्रेमात कसे कमनशिबी ठरलो, याचीही तो चर्चा करताना पाहायला मिळते.

‘किसी का भाई, किसी की जान’ या चित्रपटाच्या ट्रेलरचे प्रदर्शन झाले, त्यावेळी सलमान खानने ‘मूव्ह ऑन’असा वाक्यप्रयोग केला होता. 

याविषयी रजत शर्मा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सलमान म्हणतो की, अनलकी हू सर. यावर रजत शर्मा म्हणतात की, तो आज कल कौन है जान और किससे किया है कमिटमेंट ? यावर सलमानने मजेशीर उत्तर दिले असून तो म्हणतो की, आजकाल मी केवळ भाई राहिलेलो आहे. एवढेच नव्हे तर जे एकेकाळी मला जान म्हणायचे ते आजकाल मला भाई असे बोलावतात. त्यामुळे सध्या तरी मी फक्त भाई आहे. जिन को चाहता था, की जान बनाऊ, वो भी आजकाल भाई बुला रहे है मुझे, तो क्या करु ? हासत हासत असे उत्तर देणाऱ्या सलमानच्या वाक्यावर प्रेक्षक आणि चाहतेही हास्यात बुडत आहेत. फाहद सामजीने दिग्दर्शित केलेल्या ‘किसी का भाई, किसी की जान’ या चित्रपटात पूजा हेगडे, जगपती बाबू, जस्सी गिल, सिद्धार्थ निगम, शहनाज गिल, विजेंद्र सिंग, पलक तिवारी आदी कलाकारांची तगडी स्टारकास्ट पाहायला मिळते. सलमानचा पुढील चित्रपट हा टायगर ३ हा असून त्यात कॅटरिना कैफ आणि इम्रान हाश्मी दिसणार आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story