'पुढच्या सात जन्मांत दुसरी राखी सावंत होणार नाही'

हिंदी मनोरंजनसृष्टीत ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत सतत विविध कारणांनी चर्चेत असते. तिचे अनेक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात, तर अनेक जण राखीची कॉपीही करताना दिसतात. आता आपली कॉपी करणाऱ्यांबद्दल राखीने स्पष्ट भाष्य केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 14 Jun 2023
  • 01:14 pm
'पुढच्या सात जन्मांत दुसरी राखी सावंत होणार नाही'

'पुढच्या सात जन्मांत दुसरी राखी सावंत होणार नाही'

हिंदी मनोरंजनसृष्टीत ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत सतत विविध कारणांनी चर्चेत असते. तिचे अनेक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात, तर अनेक जण राखीची कॉपीही करताना दिसतात. आता आपली कॉपी करणाऱ्यांबद्दल राखीने स्पष्ट भाष्य केले आहे.

राखीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती तिचे अनेक व्हीडीओ सोशल मीडियावर शेअर करून गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांना शायरी ऐकवत आहे. आतापर्यंत तिच्या अनेक चाहत्यांनी तिचा आवाज वापरून तिच्यासारखा व्हीडीओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आता या सगळ्याबद्दल राखीने मौन सोडले आहे.

राखीचा एक व्हीडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे. यामध्ये ती मीडिया फोटोग्राफरशी गप्पा मारताना दिसत आहे. या वेळी एकाने तिला विचारले की, “आजकाल अनेक जण तुमची कॉपी करतात आणि व्हीडीओ बनवतात. त्यांनाही राखी सावंत बनायचे आहे. ते पाहून तुम्हाला काय वाटते?” त्यावर राखी म्हणाली, “राखी सावंत एकच आहे. ती ओरिजनल आहे. बाकी लोक तिची कॉपी करू शकतात. त्यांना ते करू दे. त्यांचे घर चालेल, पण पुढच्या सात जन्मांमध्ये कोणीही राखी सावंत बनू शकत नाही.”

आता तिच्या या व्हीडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत राखीच्या या वक्तव्यावर त्यांचे मत मांडत आहेत. यावर अनेकांनी कमेंट करत “हो राखी, तुझे म्हणणे खरे आहे. तुझ्यासारखं दुसरं कोणीच होऊ शकत नाही,” असे म्हणत ट्रोल केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story