Baipan Bhari : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

‘महाराष्ट्र शाहीर’बरोबरच केदार शिंदे आणखी एक नवाकोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या प्रदर्शनादिवशीच ‘बाईपण भारी देवा’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 29 Apr 2023
  • 02:31 pm
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

‘महाराष्ट्र शाहीर’बरोबरच केदार शिंदे आणखी एक नवाकोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या प्रदर्शनादिवशीच ‘बाईपण भारी देवा’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातून प्रत्येकीच्या आयुष्यात येणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावनांचे चित्र उभे केले जाणार आहे. या चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या या सहा बहिणींची कथा म्हणजे सर्वसामान्य आयुष्यातील सुपरवूमनची कथा आहे.

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारे असले तरी, त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरेच काही सांगून जाणारा आहे. आपल्या समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या महत्त्वपूर्ण भूमिका त्यांच्या-त्यांच्या पातळीवर बजावत असतात, पण आपलेच कळत-नकळत त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील अभिनेत्री समाजातील अशाच स्त्रियांचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत. 

केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर व दीपा चौधरी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत असणार आहेत. हा चित्रपट येत्या जून महिन्यात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story