Iranians : इराणींनी जागवल्या 'त्या' जाहिरातीच्या स्मृती

केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी यांनी २५ वर्षांपूर्वीचा एक व्हीडीओ शेअर केला आहे. हा जाहिरात व्हीडीओ प्रसिद्ध सॅनिटरी नॅपकिन ब्रँडचा होता. ज्यामध्ये अभिनेत्री पीरियड्सबद्दल अगदी स्पष्टपणे बोलताना दिसत आहे. व्हीडीओ शेअर करताना स्मृती म्हणाल्या, हा त्यांच्या करीअरमधला पहिला मोठा जाहिरातीचा व्हीडीओ होता, पण अशा प्रोजेक्टमुळे करीअर संपुष्टात येऊ शकलं असतं.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 8 May 2023
  • 10:03 am
इराणींनी जागवल्या 'त्या' जाहिरातीच्या स्मृती

इराणींनी जागवल्या 'त्या' जाहिरातीच्या स्मृती

केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी यांनी २५ वर्षांपूर्वीचा एक व्हीडीओ शेअर केला आहे. हा जाहिरात व्हीडीओ प्रसिद्ध सॅनिटरी नॅपकिन ब्रँडचा होता. ज्यामध्ये अभिनेत्री पीरियड्सबद्दल अगदी स्पष्टपणे बोलताना दिसत आहे. व्हीडीओ शेअर करताना स्मृती म्हणाल्या, हा त्यांच्या करीअरमधला पहिला मोठा जाहिरातीचा व्हीडीओ होता, पण अशा प्रोजेक्टमुळे करीअर संपुष्टात येऊ शकलं असतं.

स्मृतींच्या जाहिरातीचा व्हीडीओ ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे, ज्यामध्ये त्या पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. सॅनिटरी नॅपकिनचा व्हीडीओ शेअर करत स्मृती यांनी लिहिले, ‘‘जेव्हा तुमची पहिली जाहिरात सॅनिटरीची असेल! २५ वर्षांपूर्वी एका मोठ्या कंपनीसाठी ही माझी पहिली जाहिरात होती. तीसुद्धा कोणत्याही फॅन्सी विषयावर नव्हती. उलट, त्यावेळेस ही एका अशा उत्पादनाची जाहिरात होती ज्याच्या विरोधात बरेच लोक होते. कॅमेऱ्यासमोर माझ्या करीअरची सुरुवात करण्यासाठी मी खूप उत्साहित होते. मी प्रोजेक्टला हो म्हटलं. शेवटी, मासिक पाळी आणि स्वच्छतेबद्दल का बोलू नये? तेव्हापासून मी मागे वळून पाहिले नाही. ’’

या व्हीडीओमध्ये स्मृती महिलांना मासिक पाळीबद्दल खुलेपणाने बोलण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. व्हीडीओमध्ये स्मृती म्हणाल्या, ‘‘त्यांना पाच दिवस कशाला म्हणता. अरे यार, माझी पाळी आली आहे. हा काही आजार नाही. हे माझ्या आईसह, तुम्ही आणि जगभरातील लाखो महिलांसह प्रत्येकीबाबत घडते. मग महिलांना सॅनिटरी पॅडच्या माध्यमातून मदत का होत नाही. पीरियड्समुळे कळते आपण मोठे होत आहोत, 

मॅच्युअर होत आहोत.’’

स्मृती इराणी यांनी एक माॅडेल म्हणून काम केले आहे. टीव्ही सीरियलमध्ये येण्यापूर्वी त्या अनेक ॲड शूटमध्ये दिसल्या आहेत. त्यांनी फेमिना मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता. त्या अंतिम फेरीतही पोहोचल्या, पण विजेत्या होऊ शकल्या नाहीत. २००० मध्ये त्यांनी आपल्या करीअरची सुरुवात टीव्ही सीरियल 'हम हैं कल आज कल और कल' मधून केली. मात्र, ‘सास भी कभी बहू थी’ या टीव्ही मालिकेतून त्यांना देशभरात ओळख मिळाली. २००१ मध्ये झी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या रामायणमध्ये स्मृती यांनी सीतेची भूमिका साकारली होती. २००६ मध्ये त्यांनी बालाजी टेलिफिल्म्सच्या बॅनरखाली 'थोडी सी जमीन थोडा सा आसमान' या टीव्ही शोमध्ये दिग्दर्शक म्हणून काम केले. २००८ मध्ये, त्या साक्षी तन्वरसोबत 'ये है जलवा' या डान्स रिॲलिटी शोमध्ये होस्ट म्हणूनही दिसल्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story