संग्रहित छायाचित्र
बॉलीवूडमधील चर्चित अभिनेत्रींमध्ये रकुलप्रीत सिंगचा समावेश होतो. करिअरच्या प्रारंभीच्या काळात दोन मोठ्या चित्रपटांना तिला मुकावे लागले होते. यात ‘एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचाही समावेश होता. धोनीवरील चित्रपटातून काढून टाकल्यावर ती खूप रडली होती.
अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत रकुलने या याबाबत माहिती दिली. तिने सांगितले की, तिच्या करिअरच्या सुरुवातीला तिला दोन चित्रपटांतून काढून टाकण्यात आले होते. ती प्रभाससोबत एका चित्रपटात काम करणार होती. दुसरा चित्रपट एमएस धोनीचा बायोपिक होता, ज्यामध्ये नंतर तिच्या जागी दिशा पटानीला कास्ट करण्यात आले.
रकुल ‘एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात काम करणार होती. मात्र तिला या बायोपिक चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत होता. रकुल म्हणाली, ‘‘नंतर दिशा पाटनीला त्या भूमिकेसाठी घेण्यात आले. मी वेशभूषा आणि स्क्रिप्ट वाचन केले होते, परंतु नंतर त्यांच्या तारखा एक महिना पुढे ढकलल्या गेल्या. मी राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासोबत चित्रपटांचे शूटिंग करत होते. ‘ब्रूस ली : द फायटर’ एका महिन्यात रिलीज होणार होता आणि दोन गाणी शूट व्हायची होती. त्यामुळे तारखा मॅनेज करता आल्या नाहीत. एवढ्या चांगल्या चित्रपटात काम करायला मुकले म्हणून मी खूप रडले होते.’’
एतकेच नव्ह तर चार दिवसांच्या शूटिंगनंतर रकुलला एका चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. ‘‘'माझ्या पदार्पणापूर्वी मला एका चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते, ज्यासाठी मी चार दिवस शूटिंगही केले होते. हा प्रभाससोबतचा तेलुगू चित्रपट होता. परंतु काही वेळा जेव्हा तुम्हाला उद्योगाबद्दल किंवा त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल जास्त माहिती नसते, तेव्हा तुम्ही ते फारसे मनावर घेत नाही. माझेही तसेच झाले. मला वाटले, ठीक आहे. त्यांनी मला काढून टाकले. कदाचित ते माझ्यासाठी नव्हते. मी दुसरे काहीतरी करेन.’’
निर्मात्यांनी रकुलऐवजी जुन्या अभिनेत्रीला कास्ट करण्याचा निर्णय घेतला होता.
या चित्रपटातून वगळण्यात आल्याची माहिती कोणीही दिली नसल्याचा खुलासाही रकुलने केला आहे. ती म्हणाली, ‘‘मी माझे वेळापत्रक पूर्ण करून दिल्लीला आले. ही घटना मला नंतर कळली. मला माहिती असूनही मला ते पहिले मोठे लाँचिंग मिळणार नाही, तरीही मला माझ्या मार्गाने काम करावे लागले. त्यानंतर माझा पहिलाच चित्रपट खूप हिट ठरला.’’
रकुलने सांगितले की, तेलुगू चित्रपटातील नकारामुळे माझे मन दुखावले नाही. फक्त इंडस्ट्रीत हा चुकीचा समज पसरण्याची भीती होती की, वाईट अॅटिट्यूडमुळे मला प्रोजेक्ट्समधून बाहेर फेकले गेले. पण सुदैवाने माझ्यावर असा शिक्का बसला नाही.’’