मोडता मोडता वाचले लग्न !

अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor)आणि पत्नी मीरा राजपूत (Meera Rajput) कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. दोघांची जोडी बॉलिवूडच्या बेस्ट कपलपैकी एक आहे. एवढेच नाही तर, दोघे एकमेकांवर प्रेम व्यक्त करतानादेखील दिसतात. शाहिद आणि मीरा यांच्या लग्नाला जवळपास ८ वर्ष पूर्ण झाली आहेत. पण एक काळ असा आला होता, जेव्हा मीराने शाहिद याला सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Mon, 27 May 2024
  • 11:05 am
Shahid Kapoor , Meera Rajput

संग्रहित छायाचित्र

अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor)आणि पत्नी मीरा राजपूत (Meera Rajput) कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. दोघांची जोडी बॉलिवूडच्या बेस्ट कपलपैकी एक आहे. एवढेच नाही तर, दोघे एकमेकांवर प्रेम व्यक्त करतानादेखील दिसतात. शाहिद आणि मीरा यांच्या लग्नाला जवळपास ८ वर्ष पूर्ण झाली आहेत. पण एक काळ असा आला होता, जेव्हा मीराने शाहिद याला सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता. सांगायचे झाले तर, जेव्हा शाहिद आणि मीरा यांचे लग्न झाले होते. तेव्हा अभिनेत्याचा ‘उडता पंजाब’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. अभिनेत्याने पत्नीला एडिटिंग रूममध्ये सिनेमा दाखवला होता. ‘उडता पंजाब’ सिनेमा पाहिल्यानंतर अभिनेत्रीने शाहिदसोबत लग्न तोडण्याचा निर्णय घेतला होता.

सिनेमा पाहात असताना मीरा शाहिद याला म्हणाली, ‘तू या मुलासारखा आहेस? मला तुझ्यासोबत नाही राहायचे. मीरा आणि माझे लग्न पूर्णपणे अरेंज मॅरेज आहे. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये आम्ही एकमेकांना जास्त ओळखत नव्हतो.’ पण आता शाहिद आणि मीरा चाहत्यांना कपल गोल्स देतात. एका मुलाखतीत शाहिद म्हणाला होता, ‘माझे आणि मीराचे भांडण झाल्यानंतर १५ दिवस तरी सर्व काही ठीक होण्यासाठी लागतात. ज्यामुळे मला खूप टेन्शन येते.  शाहिद याला मीरा पहिल्या नजरेत आवडली होती. मीरा आणि शाहिद यांच्यामध्ये १३ वर्षांचे अंतर आहे. शाहीद मीरा हिच्यापेक्षा १३ वर्षांनी मोठा आहे. दोघांचे लग्न २०१५ मध्ये झाले. शाहिद बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहिद त्याच्या व्यस्त वेळापत्रकात कितीही व्यस्त असला तरी कुटुंबाला वेळ देतो. शाहिद आणि मीराचे अनेक फोटो आणि व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

शाहिदची पत्नी एक प्रसिद्ध अभिनेत्री नसली तरी, मीरा राजपूतने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मीरा कायम तिच्या वैवाहिक आयुष्य आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. मीरा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर मीरा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हीडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story