मिरर मसाला : ‘पुष्पा’चे अंगारे...

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या आगामी 'पुष्पा २' या चित्रपटातील ‘अंगारों’ या दुसऱ्या गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे. हे गाणे चित्रपटाची अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्यावर चित्रित करण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Sat, 25 May 2024
  • 11:39 am
allu arjun , pushpa

संग्रहित छायाचित्र

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या(Allu Arjun)आगामी 'पुष्पा २' या चित्रपटातील ‘अंगारों’ या दुसऱ्या गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे. हे गाणे चित्रपटाची अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) हिच्यावर चित्रित करण्यात आले आहे.

टीझरमध्ये कोणीतरी येऊन रश्मिकाला विचारते, सेटवर तिचा मेकअप कोण करून घेत आहे? ‘पुष्पा २’चे दुसरे गाणे कोणते आहे? त्याला प्रतिसाद देत रश्मिका पावले टाकते आणि गाण्याचा हुक दाखवते. सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या गाण्याचे हिंदी शीर्षक 'अंगारों- द कपल सॉन्ग' असे ठेवण्यात आले आहे. श्रेया घोषालने (Shreya Ghoshal)आवाज दिला आहे. २९ मे रोजी सकाळी हे गाणे प्रदर्शित होणार आहे.

सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट डिसेंबर २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा : द राइज' चित्रपटाचा दुसरा भाग आहे. हा चित्रपट यंदा या वर्षी १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्याशिवाय फहद फासिलदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

याआधी ‘पुष्पा २’ चित्रपटाचे पहिले साँग या महिन्याच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला होते. याला आतापर्यंत ४ कोटी २५ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. निर्मात्यांनी टीझर शेअर करून या चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे. अल्लू अर्जुनच्या ४२व्या वाढदिवसाच्या दिवशी ८ एप्रिल रोजी तो प्रदर्शित झाला. टीझरमध्ये पुष्पा एका वेगळ्या अवतारात साडी नेसून शत्रूंशी लढताना दिसत होता.

२०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा : द राइज' हा वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता. सर्व आवृत्त्यांसह, या चित्रपटाने लाइफ टाइम इंडियामध्ये ३१३ कोटी रुपये आणि जगभरात ३५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. सर्वाधिक कमाई करणाऱ्या तेलगू चित्रपटांच्या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story