Vulgarity : शील-अश्लीलची परिभाषा स्थळ-काळानुरूप वेगळी

Urfi Javed's opaque clothes and Gautami Patil's dance are constant talk in Maharashtra. There was a lot of politics over Urfi's tight clothes and Gautami's obscene dance. While Gautami apologized, on the other hand the case of Urfi vs BJP leader Chitra Wagh was well known. Similarly, State Commission for Women Chairperson Rupali Chakankar was asked about these two. Let's see what Chakankar said on that.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 21 Apr 2023
  • 02:29 am

शील-अश्लीलची परिभाषा स्थळ-काळानुरूप वेगळी

उर्फी जावेदचे अतरंगी कपडे आणि गौतमी पाटीलचा डान्स या महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत असणाऱ्या गोष्टी आहेत. उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरून व गौतमीच्या अश्लील डान्सवर बरंच राजकारणही झालं. गौतमीने माफी मागितली, तर दुसरीकडे उर्फी विरुद्ध भाजप नेत्या चित्रा वाघ हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. अशातच या दोघींबद्दल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चाकणकर काय म्हणाल्या, ते पाहूया.

गौतमी पाटील आणि उर्फी जावेद महाराष्ट्राच्या संस्कृतीचं विकृतीकरण करत आहेत, असा प्रश्न रूपाली चाकणकर यांना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, “गौतमी पाटील करतेय ते नृत्य नाही, पण या प्रकरणात राज्य महिला आयोगाला ज्या तक्रारी येतात, त्या तक्रारींची दखल घेऊन राज्य महिला आयोग संबंधित व्यक्ती, संबंधित विभाग किंवा संस्था यांच्याकडे पाठवत असतात. पण राज्यघटनेने तुम्हाला, मला जो व्यक्तिस्वातंत्र्याचा, भाषास्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे, त्यामुळे कोणी काय घालावे, कोणी काय बोलावे, कोणी काय खावे, हे कोण कुणाला सांगू शकत नाही.”

पुढे चाकणकर म्हणाल्या, 'राज्यघटना तुम्हाला, मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत असताना शील व अश्लील याची परिभाषा आपण ठरवू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट अश्लील वाटत असेल, तर दुसऱ्याला ती गोष्ट शील वाटते. त्यामुळे ही परिभाषा स्थळ, काळ वेळपरत्वे बदलत राहते. या संदर्भात कोणतीही स्पष्ट व्याख्या कायद्यात नाही. या दोघीही तुमच्या दृष्टिकोनातून अश्लील वाटत असल्या, तरी दुसऱ्यांच्या नजरेत त्या शील असू शकतात. म्हणून आपण त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू शकत नाही, पण त्यांना समज देऊ शकतो. कायदा व सुव्यवस्था पाहता त्यासाठीचे काही परिमाण ठरले आहे, त्या पलीकडे जाऊन आपण कोणतीही कारवाई करू शकत नाही,” असे रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story