Jawan : ‘जवान’चे आगमन लांबले

शाहरुख खानच्या ‘जवान’ या आगामी चित्रपटाची रीलिज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आधी हा चित्रपट २ जून रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र तो आता ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 8 May 2023
  • 09:54 am
‘जवान’चे आगमन लांबले

‘जवान’चे आगमन लांबले

शाहरुख खानच्या ‘जवान’ या आगामी चित्रपटाची रीलिज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आधी हा चित्रपट २ जून रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र तो आता ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

शाहरुख खान आणि चित्रपटाची निर्माती गौरी खान यांनी सोशल मीडियावर व्हीडीओ शेअर करून ही माहिती दिली. ॲटली या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. 'जवान' मध्ये शाहरुखसोबत विजय सेतुपती आणि नयनताराही दिसणार आहेत. विजय चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत आहे.  

विजय खलनायकाच्या भूमिकेत दिसणार

इंडिया टुडेशी बोलताना विजयने सांगितले की, तो नयनतारा आणि विघ्नेश शिवनच्या लग्नात शाहरुखला भेटला होता. लग्नातच त्याने शाहरुखला त्याच्यासोबत खलनायक म्हणून काम करायचे असल्याचे सांगितले होते. नयनतारा-विघ्नेशचा विवाह ९ जून २०२२ रोजी झाला.

याआधी जून २०२२ मध्ये चित्रपटाची शीर्षक घोषणा व्हीडीओ रिलीज झाला होता. रिपोर्ट्सनुसार, शाहरुखचे या वर्षी तीन सिनेमे रीलिज होणार आहेत. ‘पठाण’ याआधीच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडले आहेत. ‘पठाण’ने जागतिक बॉक्स ऑफिसवर १०५० कोटींचा व्यवसाय केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story