Sweet 16! : स्वीट १६ !

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वाधिक आवडीचे आणि लोकप्रिय जोडपे म्हणता येईल. सोशल मीडियावरही त्यांना खूप फॅन असून त्यांनी इन्स्टाग्रामवर काहीही टाकले तरी ते व्हायरल व्हायला क्षणाचाही वेळ लागत नाही. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाचा गुरुवारी सोळावा वाढदिवस होता. त्यामुळे त्यांनी रात्री टाकलेल्या रोमँटिक सेल्फीला अल्पावधीत प्रचंड प्रतिसाद मिळाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 22 Apr 2023
  • 12:13 pm
स्वीट १६ !

स्वीट १६ !

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वाधिक आवडीचे आणि लोकप्रिय जोडपे म्हणता येईल. सोशल मीडियावरही त्यांना खूप फॅन असून त्यांनी इन्स्टाग्रामवर काहीही टाकले तरी ते व्हायरल व्हायला क्षणाचाही वेळ लागत नाही. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाचा गुरुवारी सोळावा वाढदिवस होता. त्यामुळे त्यांनी रात्री टाकलेल्या रोमँटिक सेल्फीला अल्पावधीत प्रचंड प्रतिसाद मिळाला. 

इन्स्टाग्रामवर अभिषेकने ऐश्वर्याबरोबरचा एकत्रित काढलेला अतिशय सुंदर फोटो पोस्ट केला असून त्यामध्ये दोघांचे परस्परांवरचे प्रेम उत्कंठतेने दिसून येते. फोटोत दोघेही पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. अभिषेकने ऐश्वर्याला जवळ धरलेले असतानाच हा सेल्फी घेतला आहे. दोघेही अतिशय सुहास्य वदनाने कॅमेऱ्याकडे पाहात असून अभिषेक फोटोबाबत लिहितो की, १६ वर्षे. याबरोबर त्याने टॉफी आणि डोळ्यांची इमोजी शेअर केली आहे. ऐश्वर्यानेही इन्स्टाग्रामवर हाच फोटो शेअर केला असून त्याचे वर्णन स्वीट १६ असे केले आहे. 

रितेश देशमुख शुभेच्छा देताना म्हणतो की, विवाह वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनी आणि भाऊ@बच्चन. झोया अख्तर, अथिया शेट्टी, डायना पेंटी, फरदीन खान, सिकंदर खेर यांच्यासह अनेक मान्यवरांनी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांना लग्नाच्या १६ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. 

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले असून त्यात गुरू, रावण, कुछ ना कहो आदी चित्रपटांचा समावेश आहे. अमिताभ यांच्या मुंबईतील प्रतीक्षा या बंगल्यावर हिंदू रितीरिवाजाने या दोघांचा २० एप्रिल २००७ रोजी विवाह झाला होता. दरम्यान, पामेला चोप्रा यांच्या अंत्यदर्शनासाठी अमिताभ, अभिषेक आणि ऐश्वर्या राय गुरुवारी आदित्य चोप्रा यांच्या निवासस्थानी एकत्र आले होते. 

ऐश्वर्या राय हिचा पोन्नियन सेल्व्हन २ हा चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात ऐश्वर्या शिवाय  विक्रम, त्रिशा, जयाम रवी, कार्थी असे कलाकार पाहावयास मिळणार आहेत. अभिषेकचा दसवी चित्रपट नुकताच येऊन गेला असून आर. बाल्की यांच्या धूमर या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यामध्ये सयामी खेरची विशेष स्वरूपाची भूमिका आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story