स्वराची पहिली ईद

आपल्या वेगळ्या आणि चोखंदळ भूमिकांच्या निवडीबद्दल ओळखली जाणारी बॉलिवूड ॲक्ट्रेस स्वरा भास्कर सामाजिक कार्यकर्ता असलेला फाहद अहमदबरोबर फेब्रुवारीत विवाहबद्ध झाली होती. विवाहापूर्वीच्या आणि नंतरच्या अनेक कार्यक्रमांचे फोटो आणि व्हीडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. सर्व कार्यक्रमानंतर हे फोटो आणि व्हीडीओ शेअर केल्याने अनेक चाहत्यांना ती एक बातमी वाटत होती. आताही स्वराने विवाहानंतर प्रथमच साजऱ्या झालेल्या ईदच्या कार्यक्रमातील फोटो शेअर केले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 25 Apr 2023
  • 06:26 am
स्वराची पहिली  ईद

स्वराची पहिली ईद

आपल्या वेगळ्या आणि चोखंदळ भूमिकांच्या निवडीबद्दल ओळखली जाणारी बॉलिवूड ॲक्ट्रेस स्वरा भास्कर सामाजिक कार्यकर्ता असलेला फाहद अहमदबरोबर फेब्रुवारीत विवाहबद्ध झाली होती. विवाहापूर्वीच्या आणि नंतरच्या अनेक कार्यक्रमांचे फोटो आणि व्हीडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. सर्व कार्यक्रमानंतर हे फोटो आणि व्हीडीओ शेअर केल्याने अनेक चाहत्यांना ती एक बातमी वाटत होती. आताही स्वराने विवाहानंतर प्रथमच साजऱ्या झालेल्या ईदच्या कार्यक्रमातील फोटो शेअर केले आहेत. 

स्वराने आपल्या ट्विटरच्या अधिकृत खात्यावर ईदच्या कार्यक्रमाचे मोजके आणि देखणे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत स्वराने पारंपरिक ड्रेस घातला असून दोघेही गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये परस्परांना शुभेच्छा देत असल्याचे दिसते. स्वराने गुलाबी रंगाचा शरारा घातला असून त्यावर मोतीकाम केलेले आहे. यावरचा तिचा दुपट्टा मात्र निळ्या रंगाचा आहे. तिने आपले केस मोकळे सोडले असून चमचमत्या चंदेरी रंगाचा झुमका तिने घातलेला आहे. फाहदने मात्र गुलाबी कुर्ता आणि ओव्हरकोट, पायजमा घातला आहे. स्वराने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना आपल्या पोषाखाचा तपशीलही दिला आहे.   

अनेक फोटोंपैकी एका फोटोला स्वराने पहिली ईद अशी कॅप्शन दिली आहे. एका फोटोत स्वरा आणि फाहद असून बाकीच्या फोटोंमध्ये ते दोघे कुटुंबातील अन्य सदस्यांसमवेत दिसत आहेत. फाहदनेही दोघांचा फोटो रिट्विट केला असून आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोवर प्रतिक्रिया देताना एक फॅन म्हणतो की, इस ईद पे स्वरा जी को ब्ल्यू टिक गिफ्ट कर दो. दरम्यान या महिन्याच्या सुरुवातीला स्वराने आपला वाढदिवस साजरा केला होता. आई, पती आणि कुटुंबातील अन्य सदस्यांबरोबरचा फोटो शेअर करताना स्वरा म्हणाली होती की, एका वर्षाने मोठी झाले, पण शहाणी झाले नाही, मात्र खूप आनंदी, सुखी झाले. आपल्या शुभेच्छा, आशीर्वादासाठी खूप खूप आभार. प्रत्येकाला 

व्यक्तिगत प्रतिसाद देऊ शकत नसल्याबद्दल सॉरी. मित्र, कुटुंबीय, हितचिंतकांच्या प्रेमात कायमचे राहणे आपल्याला आवडेल. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story