Jacqueline : जॅकलिनला सुaकेशचे प्रेमपत्र!

सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा एक दीर्घ प्रेमपत्र पाठवले आहे. या पत्रात त्याने जॅकलिनच्या फिल्मफेअर अवॉर्डमधील परफॉर्मन्सची स्तुती केली आहे. तसेच तुझ्यापासून आपण कसे दुरावलो आहे याचेही वर्णन केले आहे. तुझ्या वाढदिवसासाठी आपल्याकडे एक सुपर सरप्राईझ असल्याचेही त्याने पत्रात म्हटले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 8 May 2023
  • 10:09 am
जॅकलिनला सुaकेशचे प्रेमपत्र!

जॅकलिनला सुaकेशचे प्रेमपत्र!

सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा एक दीर्घ प्रेमपत्र पाठवले आहे. या पत्रात त्याने जॅकलिनच्या फिल्मफेअर अवॉर्डमधील परफॉर्मन्सची स्तुती केली आहे. तसेच तुझ्यापासून आपण कसे दुरावलो आहे याचेही वर्णन केले आहे. तुझ्या वाढदिवसासाठी आपल्याकडे एक सुपर सरप्राईझ असल्याचेही त्याने पत्रात म्हटले आहे. या पत्रात तो म्हणतो की, माय लव्ह, माय बेबी जॅकलिन, माय बोम्मा, फिल्मफेअर अवॉर्डमधील २८ एप्रिलचा तुझा परफॉर्मन्स पाहिला, त्यातील तुझा डान्स अप्रतिम होता. एकूण सर्व कार्यक्रमातील तुझी कामगिरी सर्वोच्च दर्जाची होती. तुझी कामगिरी पाहून मी आणखी तुझ्या प्रेमात वेडा झालो आहे. तू सुपरस्टार आहेस, माय बेबी गर्ल, तुझी प्रशंसा करण्यास आता माझ्याकडे शब्द नाहीत.    

पत्रात तो पुढे लिहितो की, माय क्विन, बोट्टा बोम्मा, तू माझ्या आयुष्यात आलीस हे माझे भाग्य म्हणावे लागेल. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आणि शरीराचा प्रत्येक भाग हा तुझ्यासाठी आहे. तुझ्या प्रेमासाठी मी किती वेडा झालो आहे आणि तूही माझ्यासाठी किती वेडी आहेस याची दोघांनाही कल्पना आहे. मी तुझ्यापासून खूप दुरावलो असलो तरी तुझ्या वाढदिवसासाठी माझ्याकडे सुपर सरप्राईझ आहे. हे सरप्राईझ तुला नक्की आवडेल यात शंका नाही. 

सत्याचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून काळजी करू नकोस, लवकरच अंतिम सत्य बाहेर येईल. तू सदा हसतमुख असावीस अशी माझी इच्छा आहे. या अगोदर सुकेशने जॅकलिनला ईस्टरच्या वेळी पत्र पाठवले होते. त्यावेळी त्याने शुभेच्छा देताना जॅकलिनवर कौतुकाचा वर्षाव केला होता. पुढच्या ईस्टरला आपण तुझ्या आयुष्यातील सर्वाधिक ईस्टर साजरा करू, असे आश्वासन त्याने पत्रात दिले होते. लोकांची फसवणूक आणि सावकारीच्या आरोपाखाली सुकेश आणि त्याची पत्नी लिला पॉवलोज तुरुंगात आहेत. दिल्ली कोर्टात महसूल सक्त संचालनालयाने सुकेशवर दाखल केलेल्या खटल्यात जॅकलिनलाही आरोपी केलेले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story