Partner : ‘पार्टनर’ची जोरदार जुगलबंदी

सलमान खान आणि गोविंदा या बाॅलिवूडमधील दोन सदाबहार डान्सर्सनी ६८ व्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिला. या कार्यक्रमाचा एक व्हीडीओ समोर आला आहे. या प्रोमो व्हीडीओमध्ये, दोन्ही कलाकार त्यांच्या गाजलेल्या ‘पार्टनर’ चित्रपटातील ‘डू यू वाना पार्टनर’ या टायटल साॅंगवर ठुमके लावताना दिसले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 1 May 2023
  • 01:40 pm
‘पार्टनर’ची जोरदार जुगलबंदी

‘पार्टनर’ची जोरदार जुगलबंदी

सलमान खान आणि गोविंदा या बाॅलिवूडमधील दोन सदाबहार डान्सर्सनी ६८ व्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिला. या कार्यक्रमाचा एक व्हीडीओ समोर आला आहे. या प्रोमो व्हीडीओमध्ये, दोन्ही कलाकार त्यांच्या गाजलेल्या ‘पार्टनर’ चित्रपटातील ‘डू यू वाना पार्टनर’ या टायटल साॅंगवर ठुमके लावताना दिसले.

व्हीडीओमध्ये ५९ वर्षीय गोविंदा स्टेजवर परफॉर्मन्स देताना दिसतो. याच वेळी त्याने कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सलमानलाही स्टेजवर बोलावले आणि दोघांनीही ‘पार्टनर’च्या गाण्यावर एकत्र ठेका धरला. सोशल मीडियावर चाहत्यांनी या व्हीडीओला पसंतीची पावती दिली आहे.

डेविड धवन दिग्दर्शित 'पार्टनर' हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील सलमान-गोविंदा यांची केमिस्ट्री आणि कॉमिक टायमिंगची चाहत्यांनी खूप प्रशंसा केली होती. आता हा व्हीडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. व्हीडीओवर कमेंट करताना अनेक चाहत्यांनी 'पार्टनर-२' आणण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

या पुरस्कार सोहळ्यात संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. अभिनेता राजकुमार रावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाने १० श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले आहेत. दुसरीकडे, हर्षवर्धन कुलकर्णींच्या 'बधाई दो' या चित्रपटाने क्रिटिक्स श्रेणीत ६ पुरस्कार पटकावले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story