...म्हणून राणी सोशल मीडियावर नाही

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी त्या कलाकारांमधील आहे जिचे आजही लाखो चाहते आहेत.

 socialmedia

...म्हणून राणी सोशल मीडियावर नाही

आजही चाहते तिला मोठ्या पडद्यावर पाहायला उत्सुक असतात. आपल्या अभिनयाने तिने अनेकांची मने जिंकली आहेत. ती भलेही आज सोशल मीडियापासून दूर असेल, ती फार चित्रपटातही दिसत नाही मात्र असं असलं तरी आजच्या पिढीला देखील राणी मुखर्जी ठाऊक आहे ती तिच्या अभिनयामुळे. राणी नेहमीच या गोष्टीसाठी स्वतःलालकी मानत आली आहे. मात्र राणी कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही. ती इंस्टाग्राम, फेसबुक काहीही वापरत नाही. याचे कारण तिने आता एका मुलाखतीत सांगितले आहे.

सोशल मीडियावर आपण का नाही याचे उत्तर देत राणी मुखर्जी म्हणाली, 'मी स्वतःला प्रमोट करो अथवा न करो माझ्याकडे ते चाहते आहेत जे माझ्यावर नेहमी प्रेम करतात. माझ्या पाठिंब्यासाठी उभे असतात. मला सपोर्ट करतात. मी माझ्या प्रत्येक गोष्टीला बेस्ट देते. मला वाटते की मी सोशल मीडियावर १०० टक्के नाही देऊ शकणार. सोबतच मी जास्तीचा लोड नाही घेऊ शकणार. मला साधे जगायला आवडते. उगीच लोकांना दाखवण्यासाठी खोटे वागणे मला जमणार नाही. प्रेक्षक माझे चित्रपट पाहायला जातात तर मी त्यादृष्टीने माझा अभिनय आणखी सुधारण्याचा प्रयत्न करेन. माझ्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड होणार नाही याची काळजी घेईन. पण आता जसे सुरू आहे त्यावर मी खूप खुश आहे. त्यामुळे मी सोशल मीडियापासून दूर आहे. कामाबद्दल बोलायचे तर राणीला 'मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे' या चित्रपटात पाहिले गेले होते.  या चित्रपटाचे आणि अभिनयाचे खूप कौतुकही झाले होते. तिच्या आगामी चित्रपटाबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story