...म्हणून केले वजन कमी

सुशांत शेलारचा 'रानटी' हा आगामी सिनेमा येत आहे. या सिनेमाकरिता सुशांत शेलारने ठरवून वजन कमी केले आहे. ही संपूर्ण प्रोसेस योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. सुशांत शेलार यामागील कारणही सांगितले आहे. सुशांत म्हणाला की, सिनेमासाठी वजन कमी केळेच पण नंतर जूनपासून मला तीन ते चार वेळा फूड पॉयझनिंग झाले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 29 Sep 2024
  • 12:56 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

सुशांत शेलारचा 'रानटी' हा आगामी सिनेमा येत आहे. या सिनेमाकरिता सुशांत शेलारने ठरवून वजन कमी केले आहे. ही संपूर्ण प्रोसेस योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.  सुशांत शेलार यामागील  कारणही सांगितले आहे. सुशांत म्हणाला की, सिनेमासाठी वजन कमी केळेच  पण नंतर जूनपासून मला तीन ते चार वेळा फूड पॉयझनिंग झाले. इतक्यांदा हा त्रास झाल्यामुळे डॉक्टरांनी मला काही चाचण्या सांगितल्या. टेस्ट केल्यानंतर लक्षात आले मला ग्लुटेनची आणि अनेक पदार्थांची ऍलर्जी होत आहे. ग्लुटेन म्हणजे फक्त गहू नाही. तर माझा सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे वडापाव.

अनेक महिने मी वडापाव खाल्लेला नाही. बटाटा, पाव, गहू, दूध आणि दुग्धजन्यपदार्थ यासारख्या बऱ्याच पदार्थांची ऍलर्जी असल्याचे लक्षात आले. यामुळे हे पदार्थ वर्ज्य केले आहेत. एवढेच नव्हे तर आपल्याला बाजारात मिळणारे पदार्थ ही १०० टक्के नैसर्गिक आणि भेसळमुक्त नसतात. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी फॉलो करत आहे. या सगळ्यात सुशांत शेलार याचे ८ ते १० किलो वजन कमी झाले आहे.  'धर्मवीर २' सिनेमाच्या ग्रँड प्रीमियरनंतर सुशांत शेलारचे फोटो आणि  व्हीडीओ पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. एवढेच नव्हे तर 'तब्बेतीची काळजी घ्या?', 'सर तुम्ही बरे आहात ना?' चाहत्यांनी या शब्दात चिंता व्यक्त केली. सुशांत शेलार याने या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story