मुलीसाठी काहीही...

अभिषेक बच्चन त्याच्या ‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने एका कर्करोग रुग्णाची भूमिका साकारली आहे. चित्रपटात अनेक अडचणी असूनही आपल्या मुलीसाठी आयुष्य जगण्याची इच्छा व्यक्त करतो.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 25 Nov 2024
  • 01:49 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

अभिषेक बच्चन त्याच्या ‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने एका कर्करोग रुग्णाची भूमिका साकारली आहे. चित्रपटात अनेक अडचणी असूनही आपल्या मुलीसाठी आयुष्य जगण्याची इच्छा व्यक्त करतो. या चित्रपटाची प्रेरणा मुलगी आराध्याकडून मिळाल्याचे सांगतानाच कोणत्याही वडिलाप्रमाणे मीदेखील मुलीसाठी काहीही करायला तयार असल्याचे त्याने नमूद  केले.  

या चित्रपटाचे दिग्दर्शन शुजित सरकार यांनी केले आहे. शूजित सरकार यांच्याशी बोलताना अभिषेक बच्चनने काही वैयक्तिक गोष्टी शेअर केल्या. यावेळी तो म्हणाला, ‘‘माझ्या वैयक्तिक आयुष्याशी जोडणारा हा पहिलाच चित्रपट आहे कारण या चित्रपटाची कथा वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे.  मला या चित्रपटाची प्रेरणा माझ्या मुलीकडून मिळाली. आराध्या लहान असताना ती मुलांचे पुस्तक वाचत होती. पुस्तकातील एक ओळ मनाला भिडली. पुस्तकातील पात्राने 'मदत' हा सर्वात धाडसी शब्द म्हणून वर्णन केला आहे, कारण मदत मागणे म्हणजे तुम्ही पुढे जाण्यास आणि अडचणींना तोंड देण्यास तयार आहात. याचा अर्थ असा की तुम्ही हार मानू इच्छित नाही आणि पुढे जाण्यासाठी जे काही लागेल ते तुम्ही कराल.’’

 ‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटाची कथा वडील आणि मुलीच्या नात्यावर आहे. ज्यामध्ये वडिलांना फक्त १०० दिवस जगायचे आहे आणि त्यांना आपल्या मुलीला दिलेले वचन पूर्ण करायचे आहे. त्याची मुलगी त्याला विचारते, ‘तू माझ्या लग्नात नाचशील का?’ यावर अभिषेक म्हणतो, ‘‘माझ्या मते कोणत्याही वडिलासाठी मुलीचे लग्न हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असतो. वडिलाचे स्वप्न असते की आपल्या मुलीच्या लग्नात डान्स करणे.  माझी मुलगी अजून लहान आहे पण एक वडील असल्याने माझ्या मुलीसोबत राहण्यासाठी मला जे काही करावे लागेल ते मी करेन, अशी भावना माझ्या मनात आहे.’’

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्या काही दिवसांपूर्वीच १३ वर्षांची झाली. अलीकडेच त्याचा ‘आय वॉन्ट टू टॉक’ हा चित्रपट आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सध्या अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात कटुता आल्याची तसेच ते घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story