सहा बायका अन् प्रेमाचा गोंधळ

अभिनेता स्वप्नील जोशी याचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बाई गं’ हा स्वप्निल जोशीचा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमात सहा बायका अन् त्यांच्या प्रेमाचा गोंधळ पाहायला मिळणार आहे. येत्या १२ जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. एक नाही, दोन नाही, तीन नाही तर चक्क्क सहा बायकांसोबत प्रेमाचा चा हा नक्की काय गोंधळ? ‘बाई गं’ चित्रपटाचे पहिले गाणे  ‘जंतर मंतर’ रिलीज झाले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Thu, 13 Jun 2024
  • 03:08 pm
Entertainment news

संग्रहित छायाचित्र

अभिनेता स्वप्नील जोशी याचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बाई गं’ हा स्वप्निल जोशीचा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमात सहा बायका अन् त्यांच्या प्रेमाचा गोंधळ पाहायला मिळणार आहे. येत्या १२ जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. एक नाही, दोन नाही, तीन नाही तर चक्क्क सहा बायकांसोबत प्रेमाचा चा हा नक्की काय गोंधळ? ‘बाई गं’ चित्रपटाचे पहिले गाणे  ‘जंतर मंतर’ रिलीज झाले आहे.

अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात वेगवेगळ्या वयोगटातील हरहुन्नरी सहा अभिनेत्रींसोबत आपला जलवा दाखवताना दिसत आहे.  प्रत्येक यशस्वी पुरूषामागे स्त्रीचा हात असतो. पण जेव्हा एक नाही चक्क सहा बायका असतील. तर त्या पुरुषाची हालत काय असेल? हे येत्या १२ जुलैला ‘बाई गं’ या चित्रपटातून आपल्याला कळेल आणि आज या चित्रपटाची एक छोटीशी झलक ‘जंतर मंतर’ या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळत आहे.

स्वप्नील जोशी आणि त्याच्यासोबत सहा अभिनेत्री या सिनेमात आहेत. सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे,अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान ह्यांनी 'जंतर मंतर' ह्या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगवली आहे. 'मितवा' नंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे ह्यांची जोडी ‘बाई गं’ ह्या चित्रपटात दिसणार आहे त्यामुळे ह्या जोडीचा एक वेगळाच फॅनबेस या सिनेमासाठी उत्सुक आहे. अवधूत गुप्ते, कविता राम, मुघदा कऱ्हाडे, शरयू दाते, श्वेता दांडेकर, सुसमिता दावलकर, संचिता मोरजकर ह्यांनी 'जंतर मंतर' ह्या गाण्याला आपला आवाज दिला आहे. तर वरून लिखाते यांचे संगीत आहे. गाण्याचे बोल मंदार चोळकर यांनी लिहिले आहेत. 'जंतर मंतर' हे गाणे आपल्याला एवरेस्ट एंटरटेनमेंट वर पहायला मिळेल. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कुष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहेत. तर ह्याचे संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे.

नितीन वैद्य प्रोडक्शन, एबीसी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘बाई गं’ चं गाणे ‘जंतर मंतर’ रिलीझ होताच प्रेक्षकांना भुरळ घालत आहे, हे नक्की. एक अभिनेता आणि तब्बल ६ अभिनेत्री ही संकल्पनाच प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे. १२ जुलैला ‘बाई गं’ हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story