Shilpa Shetty : 'बहरला हा मधुमास'वर थिरकली शिल्पा शेट्टीही

‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे, तर अभिनेता अंकुश चौधरीने चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. सना शिंदे व अश्विनी महांगडे या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकांत दिसत आहेत. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांबरोबरच अनेक कलाकारांनी देखील या चित्रपटाचं कौतुक केले आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीलाही या चित्रपटातील एका गीताची भुरळ पडली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 10 May 2023
  • 03:15 am
'बहरला हा मधुमास'वर थिरकली शिल्पा शेट्टीही

'बहरला हा मधुमास'वर थिरकली शिल्पा शेट्टीही

‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे, तर अभिनेता अंकुश चौधरीने चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. सना शिंदे व अश्विनी महांगडे या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकांत दिसत आहेत. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांबरोबरच अनेक कलाकारांनी देखील या चित्रपटाचं कौतुक केले आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीलाही या चित्रपटातील एका गीताची भुरळ पडली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद, गाणी, सर्व कलाकारांचा अभिनय हे सर्वच प्रेक्षकांना खूप आवडले आहे. सोशल मीडियावर हा चित्रपट आवडल्याचे सांगत चित्रपटाच्या टीमचे नेटकरी भरभरून कौतुक करीत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीपासूनच या चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत होती. ‘बहरला हा मधुमास नवा’ या गाण्यावर अनेकांनी रील्स बनवले. आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिनेदेखील या गाण्यावर ताल धरीत रील बनवले आहे.

शिल्पा शेट्टी हिने नुकताच तिचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हीडीओमध्ये ती ‘बहरला हा मधुमास नवा’ या गाण्याची हूक स्टेप करीत थिरकताना दिसत आहे. अत्यंत आनंद घेऊन तिने या गाण्यावर नृत्य केले आहे. हा व्हीडीओ पोस्ट करीत तिने लिहिले आहे की, “बहरला हा मधुमास नवा.” तिचा हा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

शिल्पाने पोस्ट केलेला हा व्हीडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. यामध्ये तिने केलेले नृत्य सर्वांना आवडले आहे. तिच्या व्हीडीओवर प्रतिक्रिया देत नेटकरी तिचे कौतुक करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story