शर्मिन सेगल झाली ट्रोल

संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी : द डायमंड बझार’ या वेब सीरिजने सध्या सगळ्यांचच लक्ष वेधून घेतले आहे. या सीरिजमधील सेट, गाणी, कपडे आणि दागिने यांच्या भव्यतेने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली आहे. हीरामंडीची स्टारकास्टदेखील तितकीच खास आहे. वेब सीरिजमधील अभिनेत्रींचे खूप कौतुक झाले, पण शर्मिन सेगलला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Thu, 20 Jun 2024
  • 04:33 pm
Entertainment news, Sharmeen Segal

संग्रहित छायाचित्र

संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी : द डायमंड बझार’ या वेब सीरिजने सध्या सगळ्यांचच लक्ष वेधून घेतले आहे. या सीरिजमधील सेट, गाणी, कपडे आणि दागिने यांच्या भव्यतेने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली आहे. हीरामंडीची स्टारकास्टदेखील तितकीच खास आहे. वेब सीरिजमधील अभिनेत्रींचे खूप कौतुक झाले, पण शर्मिन सेगलला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.

अभिनेत्री शर्मिन सेगलने हीरामंडीमध्ये आलमजेबची भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजमधील तिच्या अभिनयामुळे तिला खूप ट्रोल केले गेले. सोशल मीडियावर तिच्या अभिनयाची खिल्ली उडवण्यात आली, तसेच अनेक मीम्सदेखील तिच्यावर बनवले गेले. तर तिच्या मुलाखतींमध्ये ती सह-कलाकारांशी ‘असभ्य’ वागते आणि ‘अनादर’ दाखवते असे बोलूनही तिला ट्रोल केले गेले. आता याबद्दल शर्मिनने मौन सोडले आहे. शर्मिन पुढे म्हणाली, “मला असे वाटते, , नकळत मला वाईट, असभ्य किंवा अनादर करणारी व्यक्ती ठरवणे अयोग्य आहे आणि त्यामुळे मला त्रास होतो. माझ्यासाठी कमेंट सेक्शनमधले लोक एखाद्या व्यक्तीला चांगले किंवा वाईट ठरवू शकत नाही, कारण ते लोक मला ओळखत नाहीत.

दरम्यान, ‘हीरामंडी : द डायमंड बझार’ ही वेब सीरिज १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. लवकरच या वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजमध्ये शर्मिनसह, अदिती राव हैदरी, मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चड्ढा, संजिदा शेख, फरदीन खान, ताहा शाह आदी कलाकार आहेत. शर्मिन म्हणाली, “माझ्या सहकलाकारांनी मला खूप सपोर्ट केला आहे.  काही जणांनी तर माझी वैयक्तिकरित्या चौकशी केली आणि पब्लिक प्लॅटफॉर्म्सवर माझ्या बाजूने ते उभे राहिले. मला तर असे वाटते की, त्यांना जाऊन एक मिठी मारावी. अदितीला माझी काळजी आहे आणि मलादेखील. सगळ्यांमध्ये तीच एक अशी आहे, जिने या महिन्यात मला अनेकदा कॉल केला आणि माझी विचारपूस केली. माझे तिच्यावर खूप प्रेम आहे. जे लोकांना आता माझ्याबद्दल वाटत आहे ते खूप चुकीचे आहे, मला तिच्याबद्दल आदर आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story